AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI, Super 8 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार म्हणाला की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. गट 1 मधून दक्षिण अफ्रिका आणि गट 2 मधून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे. आता उर्वरित दोन जागांसाठी चुरस आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यापैकी गट 1 मधून एक संघ ठरणार आहे.

IND vs WI, Super 8 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार म्हणाला की...
IND vs WI, Super 8 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार म्हणाला की...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 11:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतान साखळी फेरीच चार पैकी चार सामने जिंकले. पण सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेने पराभूत केलं आणि उपांत्य फेरीचं गणित बिघडलं. पण आता सर्व काही पुन्हा एकदा रुळावर आलं आहे. दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने भारताची वाट सुकर झली होती. त्यानंतर भारताने झिम्बाब्वेला पराभूत करत जर तरचं सर्वच टेन्शन दूर केलं. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्चला सामना होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांची बेरीज वजाबाकी करावी लागणार आहे. कारण एकही चूक स्पर्धेती आव्हान संपुष्टात आणू शकते. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने मनोगत व्यक्त केलं आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध खेळायला जातो तेव्हा आम्ही निश्चितच काही अडचणी दूर करू. मला झिम्बाब्वेच्या फलंदाजांकडून कोणतेही श्रेय काढून घ्यायचे नाही. मला वाटतं त्यांनी सुंदर फलंदाजी केली. हो, विकेट चांगली होती, पण त्यांनी डावाकडे ज्या पद्धतीने संपर्क साधला, पॉवरप्लेमध्ये त्यांचा वेळ घेतला आणि नंतर हुशारीने वेग घेतला, तो प्रभावी होता. श्रेय त्यांनाही जाते. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून, महत्त्वाच्या क्षणी काही पर्यायांसह आम्ही थोडे हुशार असू शकलो असतो. अशा परिस्थितीत, आपल्याला आपले निर्णय धैर्याने घ्यावे लागतील. सकारात्मक मार्ग स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोलकात्यात पोहोचल्यानंतर, आम्ही बसून त्या सामन्यासाठी योग्य नियोजन करू. सध्या, एक दिवस सुट्टी घेणे, प्रवास करणे आणि आराम करू.’

भारताने साखळी फेरीत अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड यांना पराभूत केलं. त्यानंतर सुपर 8 फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. या सामन्यात भारताला 76 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर भारताचा सामना झिम्बाब्वेशी झाला आणि 72 धावांनी झिम्बाब्वेला पराभूत केलं. या विजयासह भारताने 2 गुणांची कमाई केली आहे. तसेच नेट रनरेट हा -0.100 असा आहे. असं असून भारत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पण आता या गुणांचा काही एक उपयोग नाही. कारण वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळाला तर उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...