किराणा मालाचं दुकान असणारे सरदारजी, इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ!

सगळ्या प्रकरानंतर या व्यक्तीची शुद्ध प्रतिक्रिया पाहून लोक प्रचंड भावूक झाले आहेत. हे सुंदर क्षण टिपल्याबद्दल अनेकांनी फोटोग्राफरचे आभारही मानले. शेवटी सरदारजींच्या डोळ्यात अश्रू आल्यासारखे वाटत होते.

किराणा मालाचं दुकान असणारे सरदारजी, इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ!
Street photography sardarji
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 18, 2023 | 4:45 PM

मुंबई: सध्या इंटरनेटवर एक फॅड आलंय माहितेय? फॅडच म्हणावं लागेल. यात रस्त्यावरून एखादा फोटोग्राफर जात असतो आणि तो जाऊन अनोळखी लोकांचे फोटो काढतो. हेच फोटो तो त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर पोस्ट करतो. गंमत अशी आहे की हे सगळं सोशल मीडियावर पोस्ट करताना तो संपूर्ण प्रोसेसच टाकतो. कसा तो त्या अनोळखी व्यक्तीकडे गेला, त्याला कसं फोटो काढण्यासाठी मनवलं, कसे त्याचे फोटो काढले. अशी ती सगळी प्रोसेस असते ज्याचा व्हिडीओ आणि फायनल काढले गेलेले फोटो फोटोग्राफरच्या अकाऊंटवर पोस्ट केले जातात. असाच एक भन्नाट फोटो व्हायरल होतोय. किराणा मालाचं दुकान असलेले एक सरदारजी आहेत, नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानात बसलेले असतात. पुढे तुम्हीच बघा काय होतं…

सोशल मीडियावर एका वृद्ध शीख व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमुळे लाखो युजर्स भावूक झाले. एका फोटोग्राफरने सरदारजींना त्यांचे काही फोटो काढण्याची विनंती केली. जेव्हा शीख सरदारजींनी त्यांचा फोटो पाहिला तेव्हा ते खूप भावूक झाले.

व्हिडिओत तो फोटोग्राफर वृद्ध व्यक्तीच्या किराणा दुकानात गेला आणि त्याने काही टॉफी आणि चिप्सची दोन पाकिटे मागितली. त्यानंतर दुकानात तिचे फोटो काढता येतील का, अशी विचारणा केली. सुरुवातीला त्या सरदारजींना थोडं आश्चर्य वाटलं, पण त्यांनी ही विनंती मान्य करत काही फोटो काढले. त्यानंतर सुतेजसिंग पन्नू यांनी म्हणजेच फोटोग्राफरने त्या व्यक्तीचा फोटो थेट जागेवरच छापून त्याला भेट म्हणून दिला. सरदारजी हा फोटो पाहताच ते खूप भावूक झाले आणि त्यांनी हात जोडून त्या व्यक्तीचे आभार मानायला सुरुवात केली. हे पाहून सुतेजनेही त्याला मिठी मारली.

सगळ्या प्रकरानंतर या व्यक्तीची शुद्ध प्रतिक्रिया पाहून लोक प्रचंड भावूक झाले आहेत. हे सुंदर क्षण टिपल्याबद्दल अनेकांनी फोटोग्राफरचे आभारही मानले. शेवटी सरदारजींच्या डोळ्यात अश्रू आल्यासारखे वाटत होते. “आपल्या वडीलधाऱ्यांबरोबर वेळ घालवा, त्यांचे अनुभव आणि कथा लक्षपूर्वक ऐका आणि त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घ्या.” अशा पद्धतीच्या कमेंट्स यावर केल्या जात आहेत.