
सोशल मीडियाच्या या युगात, लोकांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे आणि त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, पण दुसरीकडे काही नकारात्मक गोष्टी देखील समोर आल्या आहेत, त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे ऑनलाइन ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंग. विशेषतः, मोठ्या किंवा जाड महिलांना त्यांच्या शरीरयष्टीमुळे अनेकदा लक्ष्य केले जाते. पण या द्वेषपूर्ण टिप्पण्यांचे एकमेव कारण द्वेष आहे की त्यांची मुळे खोलवर रुजलेली आहेत? कॅनडातील एका प्लस-साईज मॉडेलने या प्रश्नाचे असे उत्तर दिले आहे की त्यामुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. तिने तिच्या एका फोटोसह एक धक्कादायक सिद्धांत शेअर केला आहे, जो वाचल्यानंतर तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल.
कॅनडातील ओंटारियो येथील या 24 वर्षीय प्लस-साईज मॉडेलचे नाव ऑलिव्हिया मेसिना (Olivia Messina) आहे. तिला जाड म्हणणारी मुलं, रात्री मात्र मेसेज करून तिच्याशी फ्लर्ट करतात असा दावा ओलिव्हियाने केला आहे. या खुलाशामुळे लोकांना धक्का बसला आहे.
अलीकडेच, ऑलिव्हियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आणि ऑनलाइन बनावटीपणा करणाऱ्यांचे विचार उघड केले. ऑलिव्हियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक थिअरी शेअर केली. तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती सँडविच खात होती आणि तिने ब्रा टॉप आणि लेगिंग्ज घातली होती. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, “ज्या प्रकारची स्त्री तुम्हाला अनाकर्षक वाटते ती तुमच्या फीडवर वारंवार कशी दिसते हे मजेदार नाही का?”
काय म्हणाली ऑलिव्हिया ?
तिने पुढे लिहिलं की, “मला वाटतं जेव्हा लोक ऑनलाइन येतात आणि जाड मुलींच्या शरीरावर टीका करतात, तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी मानसिक कारण असते. माझ्याबद्दल बहुतेक द्वेषपूर्ण कमेंट्स अशा लोकांकडून येतात ज्यांच्या प्रोफाइलवर त्यांच्या बायका आणि मुलांचे फोटो असतात. मी नेहमी विचार करतो, ‘जर माझे शरीर तुम्हाला इतके घृणास्पद वाटते, तर तुम्ही ते पाहण्यासाठी इथे का आला आहात?’ असा सवालही तिने विचारला. मला वाटतं तो माझ्याकडे थोडं आकर्षित होत आहे. यामुळे त्यांना लाज वाटते आणि ते मला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात” असंही तिने लिहीलं.
तिचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी ऑलिव्हियाने आणखी एका घटनेचा उल्लेख केला. ती म्हणाली, “जेव्हा मी थोडीशी साहसी मनःस्थितीत असते, तेव्हा मी कोणत्याही बॉडी-शेमिंग कमेंटचं उत्तर ‘वेलकम, थँक्स ‘ असं देते. यानंतर, बेताल कमेंट करणाऱ्यांचा दृष्टिकोन लगेच बदलतो आणि ते माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करू लागतात. तर माझा सिद्धांत बरोबर आहे का?” ती पुढे म्हणाली, “मला अल्गोरिथम कसे काम करते हे माहित असल्याने, मी कधीही अशा व्यक्तीशी संपर्क साधणार नाही जो मला आवडत नाही.
मला वाटतं या लोकांना अल्गोरिथमबद्दल माहिती नाही आणि जेव्हा इतक्या जाड महिला त्यांच्या ‘फॉर यू’ पेजवर दिसतात तेव्हा ते गोंधळून जातात. तिने शेवटी लिहिलं, “तसे, मी एका आठवड्यात काय खाते’ याचा व्हिडिओ बनवला होता, आहे आणि या आठवड्यात तो माझ्या YouTube चॅनेलवर पोस्ट करेन” असं तिने लिहीलं. ऑलिव्हियाच्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आणि लोक कमेंटमध्ये तिचे समर्थन करताना दिसले.
यूजर्सच्या कमेंट्स
“मला तू खूप आकर्षक वाटतेस! मला आनंद वाटतं आहे की तू माझ्या फीडमध्ये आहेस आणि अल्गोरिथम काम करत आहे!” असं ऑलिव्हियाच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहीलं, “तू अद्भुत आहेस आणि तुला पाहून आम्हाला खूप आनंद झाला.” असंही आणखी एकाने लिहीलं. तू अगदी योग्य करते आहेस, काही दिवसांपूर्वी मला मिळालेल्या द्वेषपूर्ण कमेंट्स खूप मजेदार होत्या कारण त्या मला आणि माझ्यासारख्या अनेक जाड मुलींना फॉलो करत होत्या.” अशी कमेंट एका महिलेने केली. इंस्टाग्रामवर 4 लाख 29 हजारांहून अधिक लोक ऑलिव्हियाला फॉलो करतात.