PM Narendra Modi : पीएम मोदींकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर बॅक टू बॅक पोस्टमध्ये मकर संक्रांती, माघ बिहू आणि उत्तरायणच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पीएम मोदी यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये उत्तरायणच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi : पीएम मोदींकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
PM Narendra Modi
| Updated on: Jan 14, 2026 | 12:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मकरसंक्रात हा शेती पिकांशी संबंधित उत्सव आहे. जो देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थानिक परंपरा आणि रिती रिवाजांनी साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्याला उत्तरायण पर्व सुद्धा म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर बॅक टू बॅक पोस्टमध्ये मकर संक्रांती, माघ बिहू आणि उत्तरायणच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्व देशवासियांना मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा. तीळ आणि गुळाच्या गोडव्याने भरलेला भारतीय संस्कृती आणि परंपरेचा हा दिव्य उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसन्नता, संपन्नता आणि यश घेऊन येवो. सूर्यदेव सर्वांचं भलं करो” असं पीएम मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. “संक्रांतीच हे पवित्र पर्व देशाच्या विभिन्न भागात स्थानिक रिती-रिवाज आणि परंपरेने साजरं केलं जातं. भगवान सूर्याकडे मी सर्वांचा आनंद, समृद्धी आणि उत्तम स्वास्थासाठी प्रार्थना करतो” असं पीएम मोदी यांनी लिहिलं आहे.

सर्वांच्या आयुष्यात सकारात्मकता,समृद्धी येऊ दे

पीएम मोदी यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये उत्तरायणच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “मकर संक्रांतीचा हा पवित्र सण तुमचं आयुष्य आंनदाने भरु दे. सर्वांना चांगलं स्वास्थ लाभू दे. समृद्धीचा आशीर्वाद मिळू दे. या आनंदाच्या उत्सवात एकजुटतेचं बंधन अजून मजबूत होऊ दे. सर्वांच्या आयुष्यात सकारात्मकता,समृद्धी येऊ दे” असं पीएम मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय.

उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याकडे घेऊन जाते

पंतप्रधान मोदींनी असम आणि ईशान्येकडेच्या काही भागात साजरा होणारा उत्सव माघ बिहूच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. माघ बिहू पीक, समृद्धी आणि एकतेचा उत्सव आहे, असं पीएम मोदींनी म्हटलय. हा सण घरात समृद्धि, चांगलं स्वास्थ्य आणि आनंद घेऊन येवो. कृतज्ञता आणि सद्भाव ही भावना आपल्याला उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याकडे घेऊन जाते.