Railway प्रवाशाच्या बॅगेत पपी विसावला, लोकलमधला heart touching व्हीडीओ व्हायरल

इंटरनेटवर काही वेळा खूपच मजेशीर व्हीडीओ व्हायरल होत असतात. असाच समाजमाध्यमावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडीओत एका प्रवाशाने पाठीवर सॅकमध्ये कुत्र्याच्या पिल्लासोबत प्रवास करतानाचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

Railway प्रवाशाच्या बॅगेत पपी विसावला, लोकलमधला heart touching व्हीडीओ व्हायरल
puppy
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 20, 2023 | 1:27 PM

मुंबई : मुंबईची लाईफलाईन ( LIFELINE ) लोकल ( LOCALTRAIN ) आपल्या पोटातून अनेकांना घेऊन प्रवास ( JOURNY ) करीत असते. अशा प्रवासात बसायला जागा मिळाली तर जराशी डुलकी घेण्याची हुक्की येतेच असते. तर अशावेळी रोजच्या प्रवासात प्रवाशांना नेहमीच अनेक मजेशीर प्रसंगाना सामोरे जावे लागते असाच एक व्हीडीओ सोशलसाईट इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. त्यास प्रचंड लाईक केले जात आहे.

नियमानूसार आपल्याला कोणत्याही प्राण्यासोबत लोकलमधून प्रवास करता येत नाही. परंतू हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आणि संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे अगदीच नाईलाजाने काही वेळा लोकलमधून प्राण्यांसह प्रवास केला जात असतो. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. प्राण्यामुळे विरूंगळा मिळतो आणि निष्पापप्राणी आपल्या मालकावर जीवापलिकडे प्रेम करीत असल्यामुळे त्यांचा चांगलात लळा लागतो.

इंटरनेटवर काही वेळा खूपच मजेशीर व्हीडीओ व्हायरल होत असतात. असाच समाजमाध्यमावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडीओत एक पपी म्हणजे कुत्र्याचे गोंडस पिल्लू एका प्रवाशाने आपल्या छातीशी घेतलेल्या बॅगेतून डोकावताना दिसत आहे. pettownindia नावाच्या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हीडीओ शेअर झाला आहे. या पोस्टला मजेशीर अशी प्युअरलव्ह purelove अशी अगदी प्रासंगिक कॅप्शनही देण्यात आली आहे. हा प्रवासी मस्त डुलकी घेत असताना हे गोंडस पिल्लूही थोडीशी आपल्या पालकाच्या मांडीवर मस्त डुलकी घेतेय आणि मध्ये डोकावून इकडे तिकडे कुतूहलाने पाहताना दिसत आहे. 2 कोटी लोकांनी हा व्हीडीओ पाहीला आहे. तर 35 लाख लोकांनी तो लाईक केला आहे.