चित्रात एक छत्री आहे, सांगा कुठंय?

या एपिसोडमध्ये आम्ही एक अतिशय जबरदस्त चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात आपल्याला छत्री शोधावी लागेल. या फोटोमध्ये कॉफी हाऊसचे दृश्य दिसत आहे.

चित्रात एक छत्री आहे, सांगा कुठंय?
Find the umbrella
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 25, 2023 | 10:58 AM

ऑप्टिकल इल्यूजन हा एक असा खेळ आहे जो प्रत्येकाला खेळायला आवडतो. परंतु यासाठी मेंदूची, उत्तम निरीक्षण कौशल्याची आवश्यकता असते. आम्ही एक अतिशय जबरदस्त चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात आपल्याला छत्री शोधावी लागेल. या फोटोमध्ये कॉफी हाऊसचे दृश्य दिसत आहे. त्यात अनेक जण बसलेले असतात. या लोकांमध्ये एक छत्री लपलेली आहे. ही छत्री तुम्हाला शोधून दाखवायची आहे. खरं तर नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, तेव्हा एका युजरने लोकांना जोरदार आव्हान दिलं की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या. या फोटोमध्ये काही लोक कॉफी हाऊसमध्ये जाऊन चहा नाश्ता करत आहेत. एक मुलगी या लोकांना वस्तू देत आहे तर काही जण बसलेले आहेत, असेही दिसून येत आहे.

खरं तर या फोटोमध्ये एक व्यक्ती देखील दिसत आहे जी स्वतःसाठी काहीतरी मागवताना दिसत आहे. यावेळी समोर दोन जोडपी बसलेली असतात. गंमत म्हणजे छत्री दिसणार नाही अशा पद्धतीने त्यात लपवून ठेवण्यात आली आहे. ऑप्टिकल इल्युजनबद्दल बरेच काही प्रसिद्ध असले तरी खरा ऑप्टिकल भ्रम म्हणजे आपण योग्य उत्तर किती वेगाने शोधतो त्यावर आहे.

जाणून घ्या काय आहे योग्य उत्तर

हे चित्र अगदी सोपे आहे. आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगत आहोत. नीट पाहिलं तर कॉफी हाऊसच्या रिसेप्शन काऊंटरवर एका मुलाने लाल रंगाचा शर्ट घातला आहे. त्याच्या डाव्या हाताखाली पाहिलं तर एक छत्री दिसेल. आता तुम्ही किती वेळात योग्य उत्तर शोधल याचा अंदाज घ्या.

Umbrella