अजगर आणि किंग कोब्रा एकमेकात भिडले, बघा कोण जिंकलं!

हे दोन्ही महाकाय साप अत्यंत धोकादायक असून आता त्यांच्या लढाईशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे चित्र पाहूनच ही लढाई किती भयानक झाली असावी, याचा अंदाज येऊ शकतो.

अजगर आणि किंग कोब्रा एकमेकात भिडले, बघा कोण जिंकलं!
snake viral video
| Updated on: Jul 09, 2023 | 4:40 PM

मुंबई: सापाच्या भांडणाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण तुम्ही कधी अजगर आणि किंग कोब्रा यांना एकमेकांशी लढताना पाहिलं आहे का? हे दोन्ही महाकाय साप अत्यंत धोकादायक असून आता त्यांच्या लढाईशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे चित्र पाहूनच ही लढाई किती भयानक झाली असावी, याचा अंदाज येऊ शकतो. या युद्धात दोन्ही साप एकमेकांना मारतात. हा फोटो एका आयएफएस अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये अजगर आणि किंग कोब्रा यांची भयानक लढाई पाहायला मिळते. यात दोन्ही सापांना आपला जीव गमवावा लागला.

कोब्राने अजगराला गिळलं, तर किंग कोब्रा अजगराने गुंडाळला म्हणून गुदमरला. आयएफएस अधिकाऱ्याने या फोटोसोबत एक कॅप्शनदेखील लिहिले आहे ज्यामध्ये त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, माणसेही अशाप्रकारे एकमेकांना मारण्यासाठी टपलेले असतात.

हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा (@susantananda3) यांनी आपल्या ट्विटर पेजवर शेअर केला आहे. त्याने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ड्रॅगनने किंग कोब्राला गुदमरून त्याला ठार मारले, तर कोब्रानेही त्याचा चावा घेतला. दोन्ही सापांचा मृत्यू झाला, एकाचा मृत्यू गुदमरून तर दुसरा कोब्राचा विषाने झाला. आपणही एकमेकांना असेच संपवतो. इतिहास अशा गोष्टीचा साक्षीदार आहे…” या ट्विटला 6 हजारांहून अधिक लाईक्स आणि 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.