राज ठाकरे यांचं मराठी इन्फ्लुएंसरसोबत पहिलं रील; म्हणाले, इतिहास-संस्कृती आहेच पण…

Raj Thackeray First Instagram Reel With Atharva Sudame about Maharashtra History : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच इन्स्टाग्राम रील तयार केलं आहे. राज ठाकरेंचं हे पहिलं- वहिलं इन्स्टाग्राम रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. पाहा हे खास रील....

राज ठाकरे यांचं मराठी इन्फ्लुएंसरसोबत पहिलं रील; म्हणाले, इतिहास-संस्कृती आहेच पण...
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 3:35 PM

सध्या सोशल मीडियावर रील्सची क्रेझ पाहायला मिळते. कलाकार, इन्फ्लुएंसर वेगवेगळे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. या रील्सला नेटकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. मराठी इन्फ्लुएंसर्सचे रील्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही रील्स आवडतात. काही इन्फ्लुएंसर्सचे रील्स ते पाहतात. पण सध्या राज ठाकरे हे स्वत: एका रीलमध्ये पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच रील केलं आहे. त्यांचं हे पहिलं वहिलं रील सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रीलमध्ये नेमकं काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी इन्फ्लुएंसर अथर्व सुदामे याच्यासोबत रील केलं आहे. अथर्व हा राज ठाकरे यांचा आवडता इन्फ्लुएंसर आहे. एका भाषणादरम्यानही राज ठाकरे यांनी त्याचा उल्लेख केला होता. त्याच्याचसोबत राज ठाकरे यांनी रील बनवलं आहे. या रीलमध्ये अथर्व आणि राज ठाकरे यांच्यात मराठी भाषा अन् महाराष्ट्र याबाबतचा संवाद पाहायला मिळतोय.

महाराष्ट्र दिनानिमित्तच्या भाषणाची अथर्व सुदामे तयारी करतो आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची तो उजळणी करताना दिसतो. याचवेळी राज ठाकरे तिथे येतात. अथर्वच्या भाषणाचा मजकूर पाहतात. चांगलं भाषण लिहिलंय, असं राज ठाकरे अथर्वला म्हणतात. इतिहास, संस्कृतीबद्दल उत्तम लिहिलंय. पण आज आपण काय करतोय, हे देखील महत्वाचं आहे. त्या-त्या पिढ्यांनी तेव्हा चांगलंच काम केलं आहे. पण आज आपली पिढी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काय करतेय, याचा विचार होणं गरजेचं आहे. मराठी भाषा रुजवली पाहिजे. मराठी भाषा बोलली पाहिजे, असं राज ठाकरे या व्हीडिओत म्हणतात.

राज ठाकरे आणि अथर्व सुदामे यांच्या रीलला 28 लाख लोकांनी पाहिलं आहे. तर अडीच लाख लोकांनी लाईक केलंय. या व्हीडिओवर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने कमेंट केली आहे. आज आपण असं काय करणार आहोत, ज्यातून महाराष्ट्र पुढे जाईल? योग्य प्रश्न आणि विषयाची मांडणी देखील… साहेब आणि अथर्व मस्त व्हीडिओ…, असं ती म्हणाली आहे. तर भावाने राजसाहेब यांना पण रील मध्ये आणले, जिंकलास दोस्ता, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

राज ठाकरे… महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीचं नाव. राज ठाकरे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं, ते त्यांचं रूबाबदार व्यक्तीमत्व. हजारोंची गर्दी असणाऱ्या सभा अन् राज्याच्या राजकारणात वेगळं वलय असणारा राजकीय नेता. पण राज ठाकरे यांचं एक वेगळ रूप तुम्हाला या रीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.