VIDEO : मेट्रोत डुलकी लागलेल्या प्रवाशाची उंदीराने घेतली मजा, जागं आल्यानंतर काय झालं पाहा व्हिडीओत

ज्यावेळी उंदीर मेट्रोत प्रवेश करतो, त्यावेळी एका इसमाने हा व्हिडीओ शूट केला आहे. ट्विटरवरती @Jazzie654 युजर आयडीवरती हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावरती अनेक लोकांनी कमेंट केली आहे. अनेकांनी त्या इसमाला सल्ला दिला आहे.

VIDEO : मेट्रोत डुलकी लागलेल्या प्रवाशाची उंदीराने घेतली मजा, जागं आल्यानंतर काय झालं पाहा व्हिडीओत
Rat Climbs On A Passenger In Metro
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 06, 2023 | 2:09 PM

मुंबई : प्रवास (travel) करीत असताना अनेकांना झोप येते. विशेष म्हणजे रोज आपण सकाळपासून विविध ठिकाणी जात असताना असे प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अशा लोकांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. मेट्रोमधील (In Metro) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये झोपलेल्या पुरुषाच्या अंगावर उंदीर चढला (Rat Climbs). त्यानंतर तो इतके-तिकडे फिरतोय. जेव्हा जाग आली तेव्हा काय झालं ते व्हिडीओत पाहा.

व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ न्यूयॉर्क शहरातील असल्याचं म्हटलं जात आहे. एका मेट्रोच्या डब्यात उंदीर आल्यानंतर काय होऊ शकतं, हे तुम्ही व्हिडीओत पाहा. ज्यावेळी मेट्रोमध्ये त्या व्यक्तीला डुलकी लागते. त्यावेळी उंदीर येतो, त्या व्यक्तीच्या पायावरुन वरती चढतो. तरीसुध्दा त्या व्यक्तीला जाणीव होत नाही. उंदीर इकडे-तिकडे फिरू लागतो. ज्यावेळी त्या इसमाला हा त्या उंदीर दिसतो. त्यावेळी तो डायरेक्ट उडी घेतो.

ज्यावेळी उंदीर मेट्रोत प्रवेश करतो, त्यावेळी एका इसमाने हा व्हिडीओ शूट केला आहे. ट्विटरवरती @Jazzie654 युजर आयडीवरती हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावरती अनेक लोकांनी कमेंट केली आहे. अनेकांनी त्या इसमाला सल्ला दिला आहे.

या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, त्यावरुन हा व्हिडीओ न्यूयॉर्क मेट्रो मधील असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत
7 लाख लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर तीन हजार लोकांनी लाईक सुद्धा केले आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केल्या आहेत.