हाय का आता! घाबरलं ना ते कुत्रं, असं कुठं असतंय का? एवढासा जीव

इतक्यात उन्हात आरामात पडलेला भटका कुत्रा डोळे उघडतो आणि त्या...

हाय का आता! घाबरलं ना ते कुत्रं, असं कुठं असतंय का? एवढासा जीव
dog and the hippopotamus
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 17, 2022 | 12:34 PM

एक कुत्रा रस्त्यावर निवांत झोपलेला असतो. अचानक तिथे एक गेंडा येतो आणि त्याला धप्पा देतो. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आणि लोकांना हसवणाऱ्या व्हिडीओमध्ये गेंडा आणि रस्त्यावरच्या कुत्र्यामध्ये एक मजेशीर दृश्य पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीच्या दृश्यात एक गेंडा स्लीपिंग स्ट्रीट डॉगच्या जवळ फिरताना दिसत आहे.

कुत्र्याच्या जवळ गेल्यानंतर गेंड्याने डोके खाली करून शिंगाने कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला. इतक्यात उन्हात आरामात पडलेला भटका कुत्रा डोळे उघडतो आणि त्या महाकाय प्राण्याला पाहून घाबरतो.

तो टणकन उडतो आणि भुंकत पळत सुटतो. काही अंतरावर असलेले इतर अनेक कुत्रेही गेंड्याला पाहून भुंकू लागले. सध्या तरी ही घटना कुठे घडलेली आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.

या घटनेचा व्हिडिओ कुणीतरी त्याच्या मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. यानंतर त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केली. हा व्हायरल व्हिडिओ 15 नोव्हेंबर रोजी ट्विटरवर फ्रेड शुल्झ नावाच्या हँडलने पोस्ट केला होता.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फ्रेड शुल्ट्झने लिहिले आहे की, “या व्हिडिओमुळे तुमचा ब्लड ब्रशर नक्कीच वाढेल.” आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त रिट्विट आणि 184 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

सोशल मीडिया युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये अनेक मजेशीर कमेंट्स पोस्ट केल्या. एका युझरने म्हटले आहे की, “मला वाटते की कोणीतरी ‘आय वॉन्टेड अ हिप्पोपोटेमस फॉर ख्रिसमस’ हे गाणे मनावर घेतले आणि मग गेंड्याला आपल्या घरी आणले.