कुटुंबासह गावी पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकरने मातीच्या चुलीवर जेवण बनवलं, मग…

sachin tendulkar : फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, सचिन तेंडूलकर आणि त्याची पत्नी, मुलगी एका गावात पोहोचले आहेत. तिथं जाऊन ते जेवण बनवत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिनला त्याची मुलगी आणि बायको कशा पद्धतीने मदत करीत आहेत हे पाहायला मिळत आहे.

कुटुंबासह गावी पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकरने मातीच्या चुलीवर जेवण बनवलं, मग...
sachin tendulkar
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 06, 2023 | 7:56 AM

मुंबई : क्रिकेटचं ज्यावेळी नाव घेतलं जातं, त्यावेळी प्रत्येकाला सचिन तेंडूलकरची प्रत्येकाला (sachin tendulkar) आठवण होते. सचिनला क्रिकेटचा देव सुद्धा म्हटलं जातं. सचिन तेंडूलकर नुकताच ५० वर्षाचा झाला आहे. त्याने त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुध्दा केलं आहे. वाढदिवस साजरा झाल्यानंतर तो थेट एका गावाता पोहोचले आहेत. तिथं गेल्यानंतर एका चुलीवर मडकं ठेवलं आहे, त्यामध्ये सचिन कायतरी बनवतं आहे. त्यावेळी सचिनची मुलगी आणि पत्नी सचिनला (tendulkar family) मदत करीत आहे. सध्या तिथले फोटो सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल (Social Media Viral Photo) झाले आहेत. सचिनचा मुलगा सध्या मुंबई इंडियन्स या टीममध्ये खेळत असल्यामुळे तो त्यांच्या कुटुंबासोबत नाही. सचिन प्रत्येकवेळी नव्या ठिकाणाला भेट देतो आणि तिथले फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.

मुलीने चुल पेटवण्यासाठी लाकडं दिली

फोटोत दिसत असल्याप्रमाणे सचिन तेंडूलकर आणि त्यांची मुलगी आणि पत्नी मिळून एका गावाला गेले आहेत. ते कोणत्या गावात आहेत हे कुणालाच माहित नाही. परंतु तिथं आनंद घेत आहेत. सचिन पहिल्यांदा मातीच्या चुलीवर मडक्यात जेवण तयार करीत आहे. त्या कामात त्यांची मुलगी मदत करीत आहे. त्याचवेळी सचिन तेंडूलकर त्या चुलीतील आग फुकून मोठी करण्याचा प्रयत्न करीत आहे. पत्नी मटक्यात जे काही जेवण आहे, ते पाहत आहे. सचिनच्या मुलीने चुल पेटवण्यासाठी लाकडं दिली आहेत. नेटकऱ्यांनी हे फोटो पाहिल्यापासून अनेक कमेंट केल्या आहेत.

आलेल्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत

हा फोटो सचिन तेंडूलकरने स्वत: ट्विटर अकाऊंटवरती शेअर केला आहे. या फोटोला हजारोच्या संख्येने लाईक मिळाले आहेत. त्याचबरोबर फोटोवरप सुध्दा अनेक कमेंट आल्या आहेत. कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, तुम्ही खूप चांगल्या व्यक्ती आहात, मातीशी जोडलेले राहा. दुसरा नेटकरी कमेंट करताना म्हणतोय, खूप छान चित्र.