Tiger is Back, #SanjayRaut ट्विटरवर ट्रेंडिंग! “कोण आला रे कोण आला…” नेटकरी काय थांबायचं नाव घेईना

कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, टायगर इज बॅक अशा अनेक घोषणा नुसत्या ऑफलाइन नाही तर ऑनलाइन सुद्धा देण्यात येत आहेत.

Tiger is Back, #SanjayRaut ट्विटरवर ट्रेंडिंग! कोण आला रे कोण आला... नेटकरी काय थांबायचं नाव घेईना
Tiger Is Back Sanjay Raut Viral
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 09, 2022 | 5:32 PM

तब्बल 102 दिवसानंतर राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसैनिकांनी राज्यभर जल्लोष केला आहे. पेढे वाटून आणि फटाके फोडून हा जल्लोष करण्यात येत आहे. राऊत यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या घरीही त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलीये. शिवसेना नेत्यांसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही राऊत यांना जामीन मिळाल्याचं स्वागत केलंय. आज ट्विटरवर संजय राऊत यांच्या सुटकेचा जल्लोष करण्यात आलाय. मिम्स तर एकसे बढकर एक आहेत. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, टायगर इज बॅक अशा अनेक घोषणा नुसत्या ऑफलाइन नाही तर ऑनलाइन सुद्धा देण्यात येत आहेत. आता तुम्ही म्हणाल ऑनलाइन कसं? बास्स का मिम्स, पोस्टर्स याची खरी मजा तर नेटकरी ऑनलाइनच घेतायत. चला तर मग बघुयात ट्विटरवर ट्रेंडिंग असणारे #sanjayRaut