Video : एक अदा दुनिया फिदा!, सपना चौधरीचे रंगीबेरंगी ड्रेसमध्ये नव्या गाण्यावर ठुमके

सपना चौधरीच्या नावापुढे व्हायरल हा शब्द चपखल बसतो. तिच्या डान्ससाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. तिला इन्स्टाग्रामवर 4.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर ती दररोज केवळ पोस्टच नाही तर स्टोरीजही पोस्ट करत असते. यावेळी तिने शेअर केलेला'गोरी नाचे' या गाण्यावरचा डान्स चर्चेत आहे.

Video : एक अदा दुनिया फिदा!, सपना चौधरीचे रंगीबेरंगी ड्रेसमध्ये नव्या गाण्यावर ठुमके
सपना चौधरी
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 11:09 AM

मुंबई : लोकप्रिय हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) तिच्या डान्सने अनेकांना घायाळ करते. अनेकदा ती तिच्या चाहत्यांसाठी काही मनोरंजक व्हीडिओ आणत असते. आताही तिने असाच एक व्हीडिओ शेअर केला आहे. सपना चौधरीने राजस्थानी गाण्यावर डान्स केलाय. याचे बोल ‘गोरी नाचे’ (Nache Gori) असे आहेत. नेहमीप्रमाणे व्हीडिओही व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हीडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

सपनाचा व्हायरल डान्स

सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात ती ‘गोरी नाचे’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिच्या या डान्सला एक लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर आठशेहून अधिकांनी यावर कमेंट केली आहे.

सपना चौधरीच्या नावापुढे व्हायरल हा शब्द चपखल बसतो. तिच्या डान्ससाठी ती विशेष प्रसिद्ध आहे. तिला इन्स्टाग्रामवर 4.8 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर ती दररोज केवळ पोस्टच नाही तर स्टोरीजही पोस्ट करत असते. यावेळी तिने शेअर केलेला’गोरी नाचे’ या गाण्यावरचा डान्स चर्चेत आहे. यात सपनाने गुलाबी शूज घातलेत. एक सुंदर मल्टिकलर पटियाला सूट आणि डोक्यावर रंगीत ओढणी तिने घेतली आहे. सपना चौधरीच्या देसी ठुमक्यांच्या तालावर नाचताना दिसतेय. तिच्या या एदांवर अनेकजण फिदा आहेत. तिने या इन्स्टाग्राम रीलला ‘गोरी नाचे…’, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हीडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काहींनी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “ये हुई ना बात! सपना जी, तुमच्या कालच्या पोस्टने जेवढे मन दुखावले आहे, तेवढीच तुमच्या आजच्या रीलने माझ्या हृदयाला शांती दिली आहे. माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे सपना जी!”

हरियाणातील एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या सपना चौधरीने पहिल्यांदा तिच्या ‘तेरी आख्या का यो काजल’ या गाण्याने लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली. सपना चौधरीने हरियाणवी, भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती तिच्या डान्समुळे अनेकांच्या मनात घर करून आहे.