Viral Video : ऑटोवाल्याच्या मोबाईल पाहून लोक म्हणाले, आम्ही आमचा जॉब सोडतो….

Trending News : ऑटोवाल्याकडे काही हजाराचा स्मार्टफोन असणार अशी सर्वासाधारण संकल्पाना असते. परंतू सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतील एका ऑटोवाल्याकडे फोन पाहून तुम्ही हैराण व्हाल

Viral Video : ऑटोवाल्याच्या मोबाईल पाहून लोक म्हणाले, आम्ही आमचा जॉब सोडतो....
auto rikshaw driver
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 20, 2024 | 7:41 PM

सोशल मिडीयावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओमध्ये नवीन माहीती मिळत असते. तर काही व्हिडीओ केवळ मनोरंजन करणारे असतात. या व्हिडीओतून काही वेळा आश्चर्यकारक गोष्टी देखील समजतात. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर त्याच्या खिशातून त्याचा मोबाईल बाहेर काढतो तेव्हा सर्वच जण चाट पडतात. कारण या रिक्षावाल्याकडील फोनची किंमतच तितकी आहे.

 दीड लाखांचा फोन

सोशल मिडीयात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओत ऑटो चालक दिसत आहे, या ऑटो चालकाजवळ उभा असलेला एक व्यक्ती त्याला विचारतो. दाखव मलाही दाखव कोणता फोन तू घेतला आहेत. त्यानंतर ऑटो चालक आपल्या खिशातून फोन काढून त्याच्या हातात देतो. ती व्यक्ती तो फोन पाहून हैराण होते. तो फोन कुठला सामान्य फोन नसून सॅमसंगचा s24 अल्ट्रा फोन असल्याचे कळते. याच्या टॉप मॉडेलची किंमत 1.59 लाख इतकी जास्त आहे. एका ऑटो ड्रायव्हरकडे इतका महाग फोन पाहून लोक हैराण होत आहेत. सोशल मिडीयावर या फोनचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

लोक खूप मस्करी करीत आहे

या व्हिडीओला सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर @VishalMalvi_ नावाच्या खात्याने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 5.82 लाखाहून अधिक लोकांनी पाहीले आहे. या व्हिडीओला कमेंट देखील खूप येत आहेत. एकाने म्हटले आहे की ऑटो रिक्षावाले आता कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांपेक्षा जादा कमावू लागले आहेत ? अन्य एका युजरने म्हटले आहे की मला वाटते हा जॉब करुन मी चुक केली आहे…तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की भाई आम्हाला आता विचार करावा लागेल.