Seema Haider Sachin Meena Video: सीमा हैदर चा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल, नेटकरी म्हणाले- ‘आता तर हद्द झाली’

Seema Haider Viral Video: सीमा हैदर प्रेमासाठी आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आली. ती कशी आली? तिने भारतात येण्यासाठी काय काय केलं यासंदर्भातली बऱ्याच गोष्टींची चर्चा रोज सुरु आहे. सध्या हे प्रकरण बरंच तापलेलं आहे. आता सीमा हैदरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Seema Haider Sachin Meena Video: सीमा हैदर चा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल, नेटकरी म्हणाले- आता तर हद्द झाली
Seema haider sachin meena
| Updated on: Jul 15, 2023 | 3:50 PM

नवी दिल्ली: सध्या एक विषय प्रचंड चर्चेत आहे. खरं तर हा गंभीर विषय आहे. एका प्रेम कहाणीमुळे एकमेकांचे दुश्मन असणारे देश समोरासमोर येऊन ठाकले आहेत. त्यात आणखी एक चर्चा म्हणजे पबजी, या प्रसिद्ध गेममुळे या जोडप्याची ओळख झाली. आता ही ओळख भारताच्या सुरक्षेपर्यंत जाऊन ठेपलीये. सीमा हैदर प्रेमासाठी आपल्या चार मुलांना घेऊन पाकिस्तानातून भारतात आली. ती कशी आली? तिने भारतात येण्यासाठी काय काय केलं यासंदर्भातली बऱ्याच गोष्टींची चर्चा रोज सुरु आहे. सध्या हे प्रकरण बरंच तापलेलं आहे. आता सीमा हैदरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील जवळपास प्रत्येक टीव्ही चॅनेलला मुलाखती देणाऱ्या सीमा हैदर हिने मुख्य प्रवाहातील माध्यमांपासून अंतर ठेवत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवण्यास सुरुवात केलीये. सीमा सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या दुनियेत बिझी आहे. तिने एक खासगी व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीमा हैदर आणि सचिनच्या या प्रायव्हेट व्हिडिओमध्ये सीमा आणि सचिन एकमेकांच्या कुशीत दिसत आहेत. काही व्हिडीओंमध्ये सीमा सचिनच्या केसांना हात लावत आहे.

अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये तर सीमा म्हणते, “लोकांनी कितीही केले, कितीही रडले किंवा कितीही आरोप केले तरी माझ्यात आणि सचिनमध्ये काहीही बदलणार नाही.” आता सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.