AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaviya Maran : आधी पाकिस्तानी क्रिकेटपटूला विकत घेतलं, मग काव्या मारनच्या टीमच्या कोचच भारताच्या जखमेवर मोठी चोळणारं वक्तव्य

Kaviya Maran : या निर्णयावरुन सोशल मीडियावर अनेक जण सनरायजर्स हैदराबाद आणि त्यांची मालकीण काव्या मारन यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रीय भावनांचा सन्मान न केल्याचा आरोप होतोय.

Kaviya Maran : आधी पाकिस्तानी क्रिकेटपटूला विकत घेतलं, मग काव्या मारनच्या टीमच्या कोचच भारताच्या जखमेवर मोठी चोळणारं वक्तव्य
Kaviya Maran
| Updated on: Mar 13, 2026 | 12:08 PM
Share

IPL 2026 चा सीजन सुरु व्हायला आता थोडे दिवस उरले आहेत. पण त्याआधी सनरायजर्स हदैराबाद टीम आणि त्यांची मालकीण काव्या मारन वादात सापडले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीग मध्ये सनरायजर्स लीड्स हा काव्या मारन यांच्या मालकीचा संघ आहे. सन टीव्हीच्या मालकीचे हे दोन्ही संघ आहेत. गुरुवारी ‘द हंड्रेड’ लीगसाठी लिलाव झाला. त्यावेळी सनरायजर्स लीड्सने पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदला विकत घेतलं. त्यावरुन भारतात वाद सुरु झाला आहे. 2,55000 डॉलर मोजून अबरार अहमदला सनरायजर्स लीड्सने विकत घेतलं. ‘द हंड्रेड’मध्ये पहिल्यांदाच भारतीय मालकीच्या संघाने एका पाकिस्तानी खेळाडूला विकत घेतलय.

या निर्णयावरुन सोशल मीडियावर अनेक जण सनरायजर्स हैदराबाद आणि त्यांची मालकीण काव्या मारन यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रीय भावनांचा सन्मान न केल्याचा आरोप होतोय. यावर आता सनरायजर्स लीड्सचे हेड कोच डॅनियल विटोरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, “‘द हंड्रेड’च्या लिलावात आम्ही अदिल रशिदला विकत घेऊ शकलो नाही. म्हणून त्याच्याजागी अबरार अहमदला घेतलं”

अजून यावर उत्तर दिलेलं नाही

पाकिस्तानी क्रिकेटपटूला विकत घेण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर अनेक जण संताप व्यक्त करत असल्याने आता सनरायजर्स लीडचं सोशल मीडिया अकाऊंट अचानक बंद करण्यात आलं आहे. संघ मालकांनी अजून यावर उत्तर दिलेलं नाही. पण हेड कोच डॅनियल विटोरी यांनी मागणी आणि पुरवठा या आधारावर हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानकडून सतत भारतविरोधी कारवाया सुरु असतात. म्हणून मागच्या अनेक वर्षांपासून भारतात आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर बंदी आहे. आयपीएलमधील कोणतीही फ्रेंचायजी त्यांना विकत घेत नाही. पण सनरायजर्सने आपल्या परदेशातील टीमसाठी अबरार अहमदला विकत घेतलं होतं.

तो टीममध्ये आल्याने समाधान आहे

“अदिल रशिदला आमचं पहिलं प्राधान्य होतं. पण तो गेल्यानंतर आम्ही परदेशातील फिरकी गोलंदाजाला प्राधान्य दिलं. चार-पाच जण आम्ही पाहत होतो. अबरार त्यापैकी एक आहे. तो टीममध्ये आल्याने समाधान आहे” असं विटोरी लिलावानंतर बोलले. अबरार अहमदला विकत घेण्यात समाधान वाटत असेल तर ते भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. ‘द हंड्रेड’ मधील अन्य कुठल्याही भारतीय मालकाच्या संघाने पाकिस्तानी क्रिकेटपटूला विकत घेतलेलं नाही.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!