AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1700 किमी रेंज देणारी कार, लवकरच बाजारात येणार, लूक आणि फीचर्स जबरदस्त

लवकरच बाजारात येते 1700 किमी रेंज देणारी हाइब्रिड सेडान Chery Arrizo 7 कार. लुक असा की ऑडीसारख्या कारला देते टक्कर.

1700 किमी रेंज देणारी कार, लवकरच बाजारात येणार, लूक आणि फीचर्स जबरदस्त
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 05, 2026 | 3:55 PM
Share

चीनमधील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Chery ने आपल्या आगामी Arrizo 7 या प्रीमियम सेडान कारचे उत्पादन अधिकृतपणे सुरू केले आहे. एप्रिल 2026 मध्ये बीजिंग ऑटो शोमध्ये सादर करण्यात आलेल्या Arrizo S कॉन्सेप्टवर ही कार आधारित आहे. आकर्षक स्पोर्टी डिझाइन, आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार हायब्रिड इंजिनमुळे ही कार सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या दाव्यानुसार या कारच्या C-DM प्लग-इन हायब्रिड व्हेरिएंटला एकदा इंधन टाकी फुल आणि बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर तब्बल 1700 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकते.

या कारचे उत्पादनासाठी तयार असलेले स्पेसिफिकेशन्स, इंजिन आणि आकारमान यांची माहिती चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MIIT) फाइलिंगमधून समोर आली आहे.

पेट्रोल आणि प्लग-इन हायब्रिड इंजिनचे पर्याय

Chery Arrizo 7 मध्ये दोन पॉवरट्रेन पर्याय मिळणार आहेत. यामध्ये 1,5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1,5 लिटर C-DM प्लग-इन हायब्रिड इंजिनचा समावेश आहे.

पेट्रोल व्हेरिएंटमधील 1.5 लिटर टर्बो इंजिन 156 HP पॉवर आणि 235 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनला ड्युअल-क्लच ट्रान्समिशनची जोड देण्यात आली आहे.

दुसरीकडे, C-DM हायब्रिड व्हेरिएंटमध्ये 1.5 लिटर नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर आणि विशेष हायब्रिड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या व्हेरिएंटमध्ये उत्तम मायलेज आणि लांब पल्ल्याच्या प्रवासावर भर देण्यात आला आहे.

एकदा चार्जिंग आणि टँक फुल केल्यावर १,७०० किमीची रेंज!

या कारचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिची हायब्रिड रेंज. Arrizo 7 C-DM मध्ये 19.527 kWh क्षमतेची LFP बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीच्या मदतीने कार केवळ इलेक्ट्रिक मोडवर 116 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते.

तर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरच्या एकत्रित वापरातून ही कार 1700 किलोमीटरपर्यंतची एकूण रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. MIIT च्या माहितीनुसार, तिचा इंधन वापर 100 किलोमीटरसाठी केवळ 0.69 लिटर इतका नोंदवण्यात आला आहे. दोन्ही व्हेरिएंट्सचा कमाल वेग 180 किमी प्रतितास आहे.

Follow Us
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?