Selfie Viral: चल बेटा सेल्फी लेले रे! लोकं विचारतात,”आहे का गेला?”

विषारी सापाला पाहून लोक उलटे पळतात, समोर एक माणूस थंडपणे सेल्फी काढताना दिसला. आता हा व्हिडिओ पाहून काही लोकं तो सेल्फी घेणारा जिवंत आहे की गेला असा प्रश्न विचारत आहेत.

Selfie Viral: चल बेटा सेल्फी लेले रे! लोकं विचारतात,आहे का गेला?
Selfie with poisnous snake
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 26, 2022 | 9:59 AM

सेल्फीचं फॅड जबरदस्त आहे बुआ! लोकांना काहीही दिसलं की लोकं पहिला सेल्फी (Selifie) घेतात. प्रचंड वेड त्या सेल्फीचं. सोशल मीडियाच्या (Social Media) ‘दुनिये’त लोकप्रिय होण्यासाठी लोक काहीही करू शकतात. काही लोक केवळ व्हिडिओवर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालायलाही चुकत नाहीत. आता फक्त हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video)पाहा. विषारी सापाला पाहून लोक उलटे पळतात, समोर एक माणूस थंडपणे सेल्फी काढताना दिसला. आता हा व्हिडिओ पाहून काही लोकं तो सेल्फी घेणारा जिवंत आहे की गेला असा प्रश्न विचारत आहेत.

बिनधास्तपणे सेल्फी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस अजगरासोबत सेल्फी काढत आहे. तो ज्या अजगरासोबत बसला आहे, तो जगातील सर्वात लांब सापाची प्रजाती आहे. ज्याची लांबी 30 फुटांपर्यंत असू शकते. पण हा माणूस अतिशय थंडपणे सापांसोबत बिनधास्तपणे सेल्फी काढत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आरडाओरडा केला आहे, लोंकांना अक्षरशः धक्के बसतायत कारण तो साप सुद्धा तितकाच विषारी आहे.

सापासोबत सेल्फी घेणाऱ्या माणसाचा व्हिडिओ

लोकं विचारतात,”आहे का गेला?”

सापासोबत सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर world_of_snakes_ नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक व्यक्ती रेटिक्युलेटेड पायथनसोबत सेल्फी काढत आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सेल्फी काढणारी व्यक्ती जिवंत आहे की नाही, हाच प्रश्न बहुतांश युजर्स विचारत आहेत.