video : कमालच झाली, दोन तोंडाचा अत्यंत दुर्मिळ साप सापडला, पाहायला मोठी गर्दी…
निसर्गात अनेक चमत्कार घडत असतात. परंतू विज्ञानात त्यावर उत्तर असते. अनेकदा दोन तोंड असलेले जीव जन्माला येतात. परंतू ते जास्त दिवस जगत नाहीत. आता दोन तोंडाचा दुर्मिळ साप सापडला आहे.

गुजरातच्या दाहोद येथे एक खूपच हैराण करणारी आणि अत्यंत चमत्कारिक बातमी समोर आली आहे. येथे सर्पमित्रांनी एका सापला वाचवले असून या सापाला चक्क दोन तोंडे असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. निसर्ग प्रेमीसह सर्पमित्रांत यामुळे कुतूहल जागृत झाले आहे. एकच शरीर आणि दोन तोंडाच्या या अनोख्या जीवाला पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाला आहे. ही घटना केवळ दाहोद येथेच नाही तर गुजरातमधील पहिल्यांदाच घडली आहे. संपूर्ण देशात अशा प्रकारचा साप सापडल्याची ही अवघी पाचवी घटना आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
गुजरातच्या दाहोद येथील प्रकृती मित्र मंडळ रेस्क्यू टीम वन्य जीवांना वाचवण्याचे काम करत असतो. परंतू ४ ऑक्टोबर रोजी संघटनेच्या स्थापना दिनी काही वेगळेच घडले.ज्यामुळे अनोखा इतिहास रचला गेला आहे. वन विभागाच्या मदतीने या टीमने अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लब असा ‘वुल्फ स्नेक’ ( स्थानिक भाषेत वरुदंती असे म्हणतात ) चे रेस्क्यू केले आहे. ही सापाची जात विषारी नसते. मानवाला या सापाच्या पासून कोणताही धोका नसतो. या साप घराच्या आजबाजूच्या पाली, आणि छोट्या जीवांना खाऊन पर्यावरणाची निसर्ग साखळी कायम ठेवतो. या सापला दोन तोंडे असल्याने अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
दोन तोंड असलेले साप कसे जन्मतात?
विज्ञानाच्या भाषेत या दुर्लभ जेनेटिक कंडीशनला बायसेफली म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते अशी अनोखी घटना सुमारे १० लाख जीवात एकदा पाहायला मिळते. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या सापांना दोन डोक्यांसह दोन मेंदू आणि नर्व्हेस सिस्टीम असते. त्यामुळे अनेकदा दोन तोंडे वेगवेगळ्या दिशेला जाण्याचा किंवा भक्ष्य पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे या सापांना नैसर्गिक पर्यावरणात जगण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो.
येथे व्हिडीओ पाहा –
🚨 RARE TWO-HEADED SNAKE RESCUED IN GUJARAT
A rare two-headed Wolf Snake has been rescued in Dahod’s Dhanpur range in what has been reported as the first such case in Gujarat.
The condition known as bicephaly is a rare developmental abnormality in which two heads develop on a single body. Both heads function independently.
The non-venomous snake is reportedly the fifth such case documented in India.
🎥 Visuals From The Rescue
#Gujarat #Dahod #Snake
— contentkikamii (@contentkikamii) October 6, 2026