
’10 रुपये वाला बिस्कुट का पॅकेट कितने का है जी’…असे दुकानदाराला विचारत त्याचे डोके भंडावून सोडणारा मेरठचे रहिवाशी शादाब जकाती यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रसिद्ध गायक बादशाह यानेही या डायलॉगवर आपला एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.जो खूप व्हायरल होत आहे.
क्रिकेटर रिंकू सिंह याने या ट्रेंडला फॉलो करत आपला व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटी देखील या ट्रेंडला फॉलो करीत रिल्स बनवत आहेत. त्यामुळे मेरठचे छोटे गाव इंचौलीचे राहणारे शादाब जकाती आज कल खूप चर्चेत आले आहेत. युपी टक चॅनलने शादाब याची खास मुलाखत घेतली आहे. त्यात त्याने आपला प्रवास सांगितला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की शादाब एका किराणा स्टोअरमध्ये जाऊन विचारतात की ’10 रुपये वाला बिस्कुट का पैकेट कितने का है जी’ या प्रश्नानंतर दुकानदार संतापतो. शादाब त्यांच्या व्हिडीओत त्यांच्या पायाने थोडे वाकत चालण्याची विशेष ढब आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरीने प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. शादाब यांची बोलण्याची स्टाईल सोशल मीडियावर फॉलो केली जात आहे. शादाब यांना सोशल मीडियावर चांगलेच फॉलोअर आहेत.
शादाब मेरठच्या इंचौली गावातून ड्रायव्हरच्या नोकरीसाठी सौदी अरबला गेले होते. तेथे त्यांना रिल्स बनवण्याची कल्पना सुचली. परंतू तेथे त्यांना कोणी सपोर्ट केला नाही. कुटुंबानेही सपोर्ट केला नाही. लोक त्यांची थट्टा करायचे. विविध पद्धतीने बोलायचे. सहकारी हसायचे आपली कथा सांगताना शादाब भावूक झाले.
शादाब यांनी गायक बादशाह याचे आभार मानले आहेत. त्याच्यामुळे मला इतकी प्रसिद्धी मिळाल्याचे ते नमूद करतात. एके काळी आपण आर्थिक संकटात होतो. परंतू हिंमत हरली नाही. व्हिडीओ बनवल्याने त्यांना सौदीची नोकरी सोडावी लागली. कारण त्यांच्या व्हिडीओवर तेथे बंदी घातली गेली. परंतू त्यांनी नोकरी सोडत पुन्हा भारतात येऊन रिल्स बनवण्यास सुरुवात केली. आता ते प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत.शादाब मेरठच्या इंचौली गावातील छोट्या घरात रहातात.आता शादाबला भेटायला मोठ्या संख्येने लोक येतात. परंतू त्यांचे म्हणणे आहे की ते साध्या माणसासारखेच राहतात.
येथे पाहा व्हिडीओ –
शादाब यांना स्लिप डिस्कचा आजार आहे. ज्यामुळे त्यांचे चाल बदलली आणि त्यांना लंगडत चालावे लागते.परंतू त्यांचे हे कंबरेत वाकत चालणेही चाहत्यांना त्यांची स्टाईल वाटत आहे. त्यांचे म्हणणे आहे त्यांना अनेक जाहीरातीच्या ऑफर देखील आल्या आहेत. चित्रपटाच्याही ऑफर आल्या आहेत. ते म्हणतात त्यांना चित्रपटात काम करण्याची आवड नाही. आपण रिल्समध्येच समाधानी आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.