डोमिनॉज पिझ्झा मध्ये सापडला काचेला तुकडा; मुंबई पोलिसांनी ट्विट पाहिले आणि…

पिझ्झा म्हणजे जवळपास सर्वांचीच फेव्हरेट डिश. मात्र, याच पिझ्झा मध्ये काचेचा तुकडा सापडला आहे.

डोमिनॉज पिझ्झा मध्ये सापडला काचेला तुकडा; मुंबई पोलिसांनी ट्विट पाहिले आणि...
| Updated on: Oct 08, 2022 | 8:57 PM

मुंबई : पिझ्झा म्हणजे जवळपास सर्वांचीच फेव्हरेट डिश. मात्र, याच पिझ्झा मध्ये काचेचा तुकडा सापडला आहे. मुंबईतील एका ग्राहकाने प्रसिद्ध ब्रँड असलेल्या डोमिनॉज पिझ्झा(Domino’s Pizza) मध्ये काचेचा तुकडा सापडल्याचा दावा केला आहे. ग्राहकाच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी रिप्लाय दिला आहे. पिझ्झा मध्ये काचेचा तुकडा सापडल्याचे फोटो पाहून अनेकांनी संताप तसेच नाराजी व्यक्त केली आहे.

अरुण कोल्लुरी असं ट्विट करणाऱ्या ग्राहकाचे नाव आहे. डोमिनॉज पिझ्झा मध्ये काचेचा तुकडा सापडल्याचा दावा करत या व्यक्तीने याचे फोटो देखील शेअर केले आहेत.

डोमिनॉज हा जागतिक दर्जाचा पिझ्झा ब्रँड आहे. यामुळे डोमिनॉज पिझ्झा मध्ये काचेचा तुकडा सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अरुण यांनी एका फूड डिलिव्हरी अॅपवरून पिझ्झा ऑर्डर केला होता. या पिझ्झामध्ये त्यांना काचेचे तुकडे सापडले.

पिझ्झा डिलव्हरीसाठी बाहेर पडल्यानंतर बॉक्समध्ये छेडछाड केली गेली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पिझ्झाचा बॉक्स पूर्णपणे सीलबंद असल्याचे अरुण यांनी सांगितले.

अरुण यांनी ट्विटरवर पिझ्झा मध्ये काचेचा तुकडा सापडल्याचे फोटो शेअर केले. त्यांच्या या ट्विटला मुंबई पोलिसांनी रिप्लाय दिला आहे.
कृपया आधी डोमिनॉज पिझ्झाच्या कस्टमर केअरला तक्रार कळवा. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास तुम्ही कायदेशीर मदत घेऊ शकता असा सल्ला मुंबई पोलिसांनी दिला आहे. मात्र, या तक्रारीवर डोमिनॉज पिझ्झाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.