एक एक करत इतके लोक रिक्षामधून निघाले, पोलिसांना कळेना काय करावं ह्यांचं!

रस्त्यावरून जाणारी रिक्षा पोलिसांनी अडवली तेव्हा त्यात प्रवाशांची संख्या पाहून पोलीसही चक्रावून गेले.

एक एक करत इतके लोक रिक्षामधून निघाले, पोलिसांना कळेना काय करावं ह्यांचं!
Auto Rikshaw
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 10, 2023 | 2:55 PM

ट्रॅफिकचे नियम आपल्या सुरक्षेसाठीच बनवले जातात, पण काही लोकांचा मात्र यावर अजिबात विश्वास नसतो. त्यांना फक्त नियम तोडायचं माहित असतं. अनेक वेळा अशा लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. त्याचबरोबर पोलीसही हे शेअर करून लोकांना जागरूक करतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने केवळ सामान्य जनताच नाही तर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. झालं असं की, रस्त्यावरून जाणारी रिक्षा पोलिसांनी अडवली तेव्हा त्यात प्रवाशांची संख्या पाहून पोलीसही चक्रावून गेले. कारण ऑटोमध्ये 19 जण होते. विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिडिओ पाहा.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की भरधाव वेगाने रस्त्यावर कुठेतरी रिक्षा जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसलेले दिसतात. काही जण तर मागे लटकत आहेत.

मग पोलिस ऑटोकडे लक्ष देतात आणि त्याला थांबायला सांगतात. यानंतर ऑटोवाला संपूर्ण जिल्हा घेऊन जात असल्याचं आढळून येतं.

पोलिसांच्या सांगण्यावरून 19 जण एक-एक करून रिक्षातून खाली उतरतात. या व्हिडिओमध्ये पोलीस म्हणतायत, म्हणताना, “हे 19 जण आहेत.”

मध्य प्रदेश पोलिसांच्या सिधी जिल्ह्यात पोस्ट केलेल्या भागवत प्रसाद पांडे यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “अधिक राईड्स… भागवत पांडे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात.

त्याच्या मनोरंजक पोस्ट आणि व्हिडिओंमुळे तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. वाहतुकीचे नियम मजेत मोडणाऱ्यांना ते धडा शिकवतात. 55 सेकंदांची ही क्लिप आतापर्यंत 1.6 लाख वेळा पाहिली गेली आहे, तर जवळपास 6,000 लोकांना ती आवडली आहे.