सोनम वांगचुक यांची उपोषणाची प्रॅक्टीस सुरू, मायनस 20 डीग्रीत झोपले

'ऑल इज नॉट वेल इन लदाख' असे म्हणत वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी लडाखच्या प्रश्नात लक्ष घालावे यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला आहे. आमीर खान यांनी 'थ्री इडीएट' चित्रपटात त्यांचे 'फूनसुख वांगडू' हे कॅरेक्टर साकारले होते.

सोनम वांगचुक यांची उपोषणाची प्रॅक्टीस सुरू, मायनस 20 डीग्रीत झोपले
ladakh20 (1)
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jan 24, 2023 | 11:03 AM

लडाख : लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी येत्या प्रजासत्ताक दिनी पाच दिवसांच्या लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे. लडाखच्या संरक्षणासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी याआधीच जाहीर केले आहे. आता त्यांनी आपल्या उपोषणाची प्रॅक्टीस सुरू केली आहे. त्यामुळे खर्दुल्ला पास येथे रात्री उणे 20 तापमानात झोपल्याचा पुरावा म्हणून twitter वर एक व्हीडीओच पोस्ट केला आहे. खर्दुल्ला पास येथे रात्रीचे तापमान उणे 40 c डीग्री सेल्सिअस पर्यंत खाली जात असते.

अभिनेता आमीर खान याने थ्री ईडीएट चित्रपटात सोनम वांगचुक यांचे कॅरेक्टर फूनसुख वांगडू नावाने केले होते. सोनम वांगचुक इनोव्हेटर असून सोप्या पद्धतीने ते मुलांना शिक्षण मिळावे यासाठी नवनवीन प्रयोग करीत असतात. येत्या प्रजासत्ताक दिनी खार्दुंगला पास येथे ते पाच दिवसांचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्याची तयारीही देखील त्यांनी सुरू केली आहे.

 

लाक्षणिक उपोषणाची तयारी सुरू

उपोषणाच्या तयारीसाठी सोनम वांगचुक लडाखमधील एका मोकळ्या जागेवर -20 डिग्री सेल्सिअस तापमानात ते झोपले असल्याचा व्हिडिओ ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. “मी जिवंत आहे.” खारदुर्ला पासचे तापमान -40°C पर्यंत घसरत आहे, असे ट्वीट सोनम वांगचुक यांनी केले आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील लडाखचा राज्यघटनेच्या ६ व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची त्यांची मागणी आहे.