ती मुस्लिम महिला, जिच्या कुटुंबात 3 IAS, एक IPS आणि 5 RAS अधिकारी

IAS Farha Hussain Success Story : फराह हुसैन प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या कुटुंबातून येते. तिच्या कुटुंबात अनेक आयएएस, आयपीएस आणि राज्य सिविल सेवा अधिकारी आहेत. ती स्वत: एक आयएएस अधिकारी आहे.

ती मुस्लिम महिला, जिच्या कुटुंबात 3 IAS, एक IPS आणि 5 RAS अधिकारी
IAS Officer
Image Credit source: linkedin
| Updated on: Oct 31, 2024 | 3:12 PM

UPSC परीक्षा पास होणच एक मोठ चॅलेंज आहे. त्यात टॉप रँक घेऊन IAS आणि IPS अधिकारी बनणं त्यापेक्षा मोठ चॅलेंज आहे. देशात दरवर्षी लाखो युवक-युवती UPSC ची परीक्षा देतात. पण त्यापैकी काहीच भाग्यशाली असतात. कारण UPSC ची परीक्षा पास होणं सोप नाहीय. ही एक्जाम क्रॅक करणारे विविध सरकारी विभागात IAS-IPS म्हणून नोकरी करतात. आज आम्ही तुम्हाला अशा मुस्लिम महिलेबद्दल सांगणार आहोत, जी स्वत: IAS अधिकारी आहेच. पण तिच्या कुटुंबातील अनेक IAS, IPS आणि राज्य सिविल अधिकारी आहेत.

या मुस्लिम महिलेच नाव फराह हुसैन आहे. ती राजस्थानच्या झंझुनूची राहणारी आहे. आपल्या कुटुंबापासून तिला प्रेरणा मिळाली. वर्ष 2016 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी ती देशातील सर्वात कठीण परीक्षा समजल्या जाणाऱ्या UPSC मध्ये पास झाली. ती अशा प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या कुटुंबातून येते, जे अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाचे सदस्य आहेत.

पण नंतर ती IAS अधिकारी झाली

फराहने मुंबईच्या गवर्नमेंट लॉ कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. तिने कायद्याच शिक्षण घेतलय. त्यानंतर ती क्रिमिनल लॉयर बनली. लहानपणी फराहने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला होता. तिच डॉक्टर बनण्याच स्वप्न होतं, पण नंतर ती IAS अधिकारी झाली.

कुटुंबात कोण-कोण IAS?

फराहचे वडील अशफाक हुसैन IAS अधिकारी म्हणजे जिल्हा कलेक्टर होते. राजस्थान प्रशासनिक सेवेत ते होते. वर्ष 2016 मध्ये IAS म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. त्याशिवाय फराहचे काका लियाकत खान आयपीएस अधिकारी होते. दुसरे काका जाकिर खान आयएएस अधिकारी होते. दोन चुलत भाऊ भाई राजस्थान प्रशासनिक सेवा (आरएएस) मध्ये आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या कुटुंबातील 14 पेक्षा अधिक सदस्य विविध सेवांमध्ये वरिष्ठ पदावर आहेत.