Love Story : प्रेमात वेडवले दोघे, घरातून पळाले, ना उरले कशाचे भान, मग पुढे झाले असे की…

Love Story Side Effect : एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या त्या दोघांनी मागचा पुढचा विचार न करता सुरतवरून थेट जळगाव गाठले. प्रेमाच्या आणाभाका घेऊन ते आले तर खरे...पण त्यांच्या भविष्यात वेगळेच काही लिहिले होते...

Love Story : प्रेमात वेडवले दोघे, घरातून पळाले, ना उरले कशाचे भान, मग पुढे झाले असे की...
लव्ह स्टोरी
Image Credit source: गुगल
| Updated on: May 24, 2025 | 4:06 PM

सुरतमधील 19 वर्षाच्या तरुणीचे एका 17 वर्षाच्या तरुणावर जीव जडला. तिने त्याला प्रेमाची कबुली दिली. मग याला पण हर्षवायू झाला. एकाच भागात राहत असल्याने नजरानजर होऊ लागली. पण आता दोघांना हा विरह सहन होत नव्हता. किती दिवस असं लपूनछपून भेटणार. मग दोघांनी या जालीम दुनियेपासून चार हात दूर जाण्याचा कोण निर्णय घेतला. एक दिवस संधी मिळताच दोघे नौ दो ग्यार झाले. दोघांनी सुरत सोडले नि थेट महाकालच्या नगरीत, उज्जैनमध्ये आश्रय घेतला. इकडे दोन्ही कुटुंब हैराण झाले. मग पोलिसांकडे त्यांनी धाव घेतली.

मुलीने मुलाला लावली फूस

या तरुणीला हा मुलगा आवडला. तिने मग वेळ दवडला नाहीच. त्याला तिने बिनधास्तपणे सर्व मामला कथन केला. त्याच्या अल्लड मनाला तर स्वर्ग ठेंगणा झाला होता. दोघांनी उज्जैनमध्ये काही दिवस घालवले. पण गावातील आणि सुरतमधील काही लोकांचे दर्शन झाल्यानंतर त्यांनी हे शहर सोडले. ते दोघे जळगावमध्ये आले. मुलगा अवघ्या 17 वर्षांचा असल्याने आई-वडील वेगळ्याच विचारात होते. आपण तर त्याच्यावर अभ्यासाचा कोणताच दबाव टाकला नसल्याचे ते आठवत होते. पण मुलाने वेगळीच परीक्षा दिल्याचे त्यांच्या गावी पण नव्हते.

मुलाने घरातून चोरले 10 लाख

हा मुलगा एकतर नुकताच तारुण्यात पदार्पण करणार होता. त्यात त्याने 10 लाख रुपये घरातून चोरले होते. त्याचे कोणी अपहरण केले की त्याचे काही बरेवाईट झाले याची चिंता आई-वडिलांना लागली होती. त्याल पबजीसारख्या गेमचे तर व्यसन लागले नाही ना हे ते आठवत होते. पण तो कोणत्या व्यसनात अडकला हे त्यांना नंतर कळाले. पोलिसांना ही बाब समजताच ते पण सतर्क झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि खबऱ्यांचे नेटवर्क फिरवले.

तरुणीवर पोस्कोअंतर्गत गुन्हा

पोलिसांना एकूणच चक्कर लक्षात आला. पोलिसांनी उज्जैन येथे ठावठिकाणा शोधला. मग तिथेच त्यांना एक क्लू मिळाला. सीसीटीव्ही आधारे हे जोडपे महाराष्ट्राकडे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांना जळगावमध्ये ताब्यात घेण्यात आले. मुलगा अल्पवयीन असल्याचे कारण पुढे आल्याने या तरुणीवर POCSO कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.