AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुलै महिन्यापूर्वीच का पळताहेत या देशातील लोक? नवीन बाबा वेंगाच्या त्या भविष्यवाणीने एकच खळबळ

Japanese Baba Vanga Prediction : जपानमधील मंगा कलाकार रिओ तात्सुकी हिच्या भाकि‍ताने सध्या खळबळ उडाली आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. यापूर्वी तिने जे सांगितले ते घडलं आहे, त्यामुळे आता लोक काळजी घेत आहे, काय आहे तिचे भाकीत?

जुलै महिन्यापूर्वीच का पळताहेत या देशातील लोक? नवीन बाबा वेंगाच्या त्या भविष्यवाणीने एकच खळबळ
त्या भाकिताने पूर्व-दक्षिण आशियात पळापळImage Credit source: गुगल
| Updated on: May 24, 2025 | 3:06 PM
Share

जगाची नवीन ‘बाबा वेंगा’च्या भाकि‍ताने संपूर्ण जपानची झोप उडवली आहे. ही भविष्यवाणी आहे पण तशी, त्यामुळे जपानच्या पर्यटन क्षेत्रावर जणू अवकाळा आली आहे. जुलै महिन्यात ज्या यात्रेकरूंनी जपान फिरण्याची योजना आखली होती, त्यांनी हा प्लॅन रद्द केला आहे. त्यांनी विमानाचे तिकीट रद्द केले आहेत. काहींनी हॉटेलचे बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे जपानच्या पर्यटन विभाग पण गडबडून गेला आहे. जपानची मंगा कलाकार रियो तात्सुकी (Ryo Tatsuki) हिच्या भाकि‍ताने ही खळबळ उडाली आहे. तिला जपानची बाबा वेंगा पण म्हणतात. तिची चर्चा यापूर्वी पण जागतिक मंचावर झाली आहे. तिच्या गूढ चित्रांनी सुद्धा जगाचा पसारा असा अनाकलनीय कसा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जुलै 2025 साठी तिने केलेल्या भाकि‍ताने गदारोळ माजला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. यापूर्वी तिने जे सांगितले ते घडलं, त्यामुळे आता लोक काळजी घेत आहे, काय आहे तिचे भाकीत?

काय आहे रिओ तात्सुकीची भविष्यवाणी?

तर रिओ तात्सुकी ही चित्रकार तशीच एक लेखिका पण आहे. तिने “The Future I Saw” (2021 मधील सुधारीत आवृत्ती) मध्ये जुलै 2025 मध्ये जपान आणी आजूबाजूच्या देशांना नैसर्गिक संकटाचा मोठा सामना करावा लागेल, असे भाकीत केले आहे. या काळात समुद्रात गगनचुंबी लाटा उसळणार. एक विशाल त्सुनामी येणार. 2011 मधील तोहोकू भूकंपापेक्षा पण ही त्सुनामी विनाशकारी, नुकसानदायक असल्याचा अंदाज तिने वर्तवला आहे. जपान, तैवान, इंडोनेशिया, उत्तरी मारियाना बेट समूह, व्हिएतनामसह अनेक देशांच्या किनारपट्यांना त्याचा फटका बसेल असे भविष्य तिने वर्तवले आहे. त्याचा धसका पर्यटकांनीच नाही तर स्थानिक नागरिकांनी पण घेतला आहे.

पर्यटकांची पळापळ

या भाकितामुले पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटकानी, विशेष हाँगकाँग आणि तैवानमधील पर्यटकांनी धास्ती घेतली आहे. त्यातील काहींनी तर या काळातील बुकिंग रद्द केल्या आहेत. विमान कंपन्यांचे आणि हॉटेल बुकिंग कॅन्सलची जणू लाटच आली आहे. तर जपानची राजधानी टोकियोसह ओसाका आणि ओकिनावा या शहरातील हॉटेल आणि विमान सेवेचे बुकिंग 50 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे समोर येत आहे. हाँगकाँगमधील WWPKG या टुरिस्ट ऑपरेटरनने पण जपानसाठीचे अनेक बुकिंग रद्द झाल्याचे म्हटले आहे. अनेक जण दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि थायलंडमधील सुरक्षित बेटाकडे वळाले आहेत.

यापूर्वी रिओ तात्सुकी हिने अचूक भविष्यवाण्या केल्या आहेत. तिने 2011 मधील तोहोकू भूंकप आणि काही इतर प्रमुख घटनांची नोंद तिच्या पुस्तकात केली होती. 1999 मध्ये हे पुस्तक बाजारात आले, तेव्हा तिच्या दाव्याकडे अनेकांनी फँटसी म्हणून पाहिले होते. पण जेव्हा या घटना घडल्या. त्यावेळी तिची मुलाखत घेण्यासाठी एकच गर्दी झाली. आता तिच्या याच पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीत असे भाकीत असल्याने हा गदारोळ उडाला आहे. त्यातच चीन सरकारने त्यांच्या नागरिकांना या प्रदेशातील किनारपट्टीवर पर्यटनासाठी जाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर जपानच्या हवामान खात्याने (JMA) तात्सुकीचे दावे फेटाळले आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या कोणत्याही भूगर्भीय हालचाली आढळलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.