
Swapna Shastra : सर्व शास्रांप्रमाणा हिंदू धर्मातही स्वप्न शास्राला खूप महत्व आहे. स्पप्नशास्र म्हणते की प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ अवश्य असतो. स्वप्न शास्रानुसार प्रत्येक स्वप्न व्यक्तीला काही ना काही संकेत देत असते. स्वप्नाचे हे संकेत शुभ देखील असू शकतात किंवा अशुभ देखील असू शकतात.यात संकेतात काही संकेत असेही असतात जे आर्थिक हानी, धन संपत्तीशी येणाऱ्या अडचणींच्याकडे इशारा करत असतात.
जर व्यक्तींनी या स्वप्नांच्या संकेताना वेळीत ओळखले तर ते मोठ्या आर्थिक संकटांपासून वाचू शकतात. आणि वेळीच सावधान होऊ शकतात. चला तर पाहूयात या स्वप्नांच्या संदर्भातील काही संकेत काय असतात. स्वप्न शास्रात धनहानी होण्यापूर्वी काय संकेत दिलेले असतात.
जर स्वप्नात इथे तिथे पसरले पैसे किंवा नोटा दिसत असतील तर हे याचे संकेत थोडे धक्कादायक असतात. अशा व्यक्तीच्या जीवनात खर्च वाढणार आहेत. हे स्वप्न अशो लोकांना पडतात ज्यांना पैशाची कद्र नसते.
जर कोणाला स्वप्नात सतत पाणी वाहताना दिसत असेल वा हातातून धनदौलत निसटताना दिसत असेल तर हे या गोष्टीचा संकेत आहे की त्याच्या जीवनात लवकरच खर्च वाढणार आहे.
जर कोणाला स्वप्नात रस्ता धुसर दिसत असेल,चोरी बाजूला अंधार नजर येत असेल तर हे स्वप्न संकेत आहे की त्याला त्याच्या आर्थिक निर्णयाबाबत भ्रम आहे. हे याबाबीचे देखील संकेत आहे की घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये.
जर एखाद्याला स्वप्नात दागिने हरवलेले दिसत असतील तर हे या बाबीचे संकेत आहे की त्याच्या मुल्यवान वस्तूची क्षति किंवा हानी होऊ शकते. किंवा त्याचे पैसे अडकू शकतात.
जर स्वप्नात एखाद्या रिकामी तिजारी, कपाट किंवा पर्स दिसत असेल तर हे स्वप्न आर्थिक हानी होण्याचे संकेत आहेत. अशात खर्चांना कंट्रोल करायला हवे.
(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी याला दुजोरा देत नाही. )