हेल्मेट न घालताच गाडी चालवताना दिसले नागालँडचे मंत्री! प्रश्न उपस्थित केल्यावर असं उत्तर दिलं कि अबब! लोक हसून वेडे

ते त्याच्या विनोदी उत्तरांसाठी आणि मनोरंजक पोस्टसाठी फॉलोअर्समध्ये ओळखला जातात. सध्या त्यांचे एक ट्विट खूप चर्चेत आहे. झालं असं की ट्विटरवर एका युजरने हेल्मेटशिवाय हार्लेवर बसलेला त्याचा फोटो शेअर केला. ज्यावर ट्विटर युजर्स बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.

हेल्मेट न घालताच गाडी चालवताना दिसले नागालँडचे मंत्री! प्रश्न उपस्थित केल्यावर असं उत्तर दिलं कि अबब! लोक हसून वेडे
nagaland minister
| Updated on: May 25, 2023 | 1:58 PM

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांची सोशल मीडियावर एक वेगळी फॅन फॉलोयिंग आहे. ते त्याच्या विनोदी उत्तरांसाठी आणि मनोरंजक पोस्टसाठी फॉलोअर्समध्ये ओळखला जातात. सध्या त्यांचे एक ट्विट खूप चर्चेत आहे. झालं असं की ट्विटरवर एका युजरने हेल्मेटशिवाय हार्लेवर बसलेला त्याचा फोटो शेअर केला. ज्यावर ट्विटर युजर्स बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर रॉक लुंगलेंग नागा नावाच्या युजरने मंत्री तेमजेन यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ते हेल्मेटशिवाय हार्ले बाईकवर बसलेले दिसत आहेत. लोकांनी हीच गोष्ट पकडली आणि बोलू लागले. कुणी विचारलं – हेल्मेट का नाही, तर कुणी कमेंट केली – त्यांचं डोक्याच्या आकाराचं हेल्मेट बनलं नाही. ट्रोल झाल्यानंतर मंत्र्यानी आपल्या शैलीत दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

मंत्र्यांनी मजेशीर स्वरात लिहिलं आहे, आता पोज देण्यासाठी भैय्या, स्टाईलचीही गरज आहे. मात्र हेल्मेटशिवाय प्रवास करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ही पोस्ट चार लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे, तर 10 हजारहून अधिक लाइक्स आणि 614 रिट्वीट मिळाले आहेत.