आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं, स्वर्गसुख! पोरानं चारचाकी घेतली, आईने चालवली, आईचा आनंद बघा

या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की, साडी नेसलेली एक महिला महिंद्राची प्रसिद्ध एसयूव्ही कार चालवत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य हे सांगत आहे की ती ड्रायव्हिंगचा किती आनंद घेत आहे.

आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं, स्वर्गसुख! पोरानं चारचाकी घेतली, आईने चालवली, आईचा आनंद बघा
Mother Son Viral Videos
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 15, 2022 | 5:40 PM

पालक (Parents) आपल्या मुलांकडून काही मागत नाहीत.त्यांना फक्त आपल्या मुलांनी पायावर उभं राहून आपलं आयुष्य जगावं अशी इच्छा असते. मुलांच्या चढ-उतारातही पालक त्यांना पूर्ण पाठिंबा देतात. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आपल्या इच्छाही मारून टाकतात. मुलं मोठी झाली की आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. हा व्हिडिओ याचा पुरावा आहे. एका मुलाने आपल्या आईला लक्झरी एसयूव्ही (Luxury XUV)चालवण्यासाठी दिली आणि तेव्हा त्याने आपल्या आईचा व्हिडीओ (Mother Video Driving Car) शूट केला. आता आईची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही क्लिप पाहून तुमचाही दिवस सुंदर होईल.

या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की, साडी नेसलेली एक महिला महिंद्राची प्रसिद्ध एसयूव्ही कार चालवत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य हे सांगत आहे की ती ड्रायव्हिंगचा किती आनंद घेत आहे.

खरं तर हा व्हिडिओ एका मुलाने शेअर केला होता आणि सांगितलं होतं की, जेव्हा त्याने आईला एसयूव्ही कार चालवायला दिली, तेव्हा तिची प्रतिक्रिया खूप आश्चर्यकारक होती. स्वतः मुलाने शूट केलेला हा व्हिडीओ, प्रेमाचं एक अनोखं रुप आहे.

इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करताना saikiran_kore लिहिले – आई, माझी महिंद्रा एक्सयूव्ही 700 चालवत आहे.

व्हिडिओ

गाडीच्या आतील दृश्य पाहता हे लक्षात येईल की, ही कार एकदम लक्झरी असून अनेक हायटेक गोष्टी उपस्थित आहेत.

मुलगा आपल्या आईशी बोलत असून आई साध्या साडीत गाडी चालवत आहे. रस्त्यावरून गाडी चालवत असताना तिच्या जवळून अनेक वाहने गेली, पण जणू काही त्या महिलेला गाडी चालवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, असे वाटत होते.

या क्लिपला आतापर्यंत 25.1 दशलक्ष व्ह्यूज आणि 1.8 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत. खरं तर हा व्हिडिओ इतका सुंदर आहे की, बघताना सुद्धा एखादा भावुक होईल.