VIDEO | मांजर अडकली, रस्ता सापडेना झालाय, मग ससा मित्राला बाहेर पडण्यासाठी मदत करु लागला

VIRAL VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मांजर एका बंद ठिकाणी फसली आहे, त्यावेळी तिथं सशाने कशा पद्धतीने मदत केली आहे हे पाहायला मिळत आहेत.

VIDEO | मांजर अडकली, रस्ता सापडेना झालाय, मग ससा मित्राला बाहेर पडण्यासाठी मदत करु लागला
VIRAL VIDEO
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 16, 2023 | 11:40 AM

मुंबई : सध्या तुम्ही चांगली गोष्ट पाहणाऱ्या मूडमध्ये असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. तुमचा दिवस एकदम भारी जाईल एवढं मात्र नक्की. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना अधिक आवडला आहे. एका ठिकाणी मांजर (Cat) फसली आहे, त्या मांजराला बाहेर येण्यास रस्ता सापडत नाही, अशावेळी सश्याने (Rabbit) मांजराला कशा पद्धतीने मदत केली हे तुम्ही पाहा. ही छोटीशी क्लीप सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. काही लोकांना प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला आवडते. ज्यांना प्राण्यांचे व्हिडीओ (aminal viral video) पाहायला आवडतात, त्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओला ट्विटरवरती @AnimalBeingBro5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. त्या व्हिडीओमध्ये मांजर एका ठिकाणी चांगलचं फसलं आहे. त्यावेळी ससा तिथं जाऊन परिस्थिती पाहतो. मांजर बाहेर येण्यासाठी तो तिथली त्याच्या पायाने जमीने खोदतो. तिथं एक मोठा खड्डा तयार करतो आणि त्यानंतर तिथं रस्ता तयार होतो.

पोस्ट ज्यांनी व्हायरल केली आहे, त्यामध्ये लिहीलं आहे की, एक ससा एका मांजराला वाचवत आहे. त्याला बाहेर निघण्याचा रस्ता मिळत नाही आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत तीन लाख लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांचा स्वत:च्या डोळ्यावर विश्वास राहिलेला नाही. काही नेटकरी म्हणत आहे की, या व्हिडीओने आमचं मन जिंकलं आहे. आणखी एकजण म्हणतोय की “लिटल जेंटलमन.”


प्राण्यांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आहेत. त्याचबरोबर प्राण्यांचे व्हिडीओ देखील पाहायला अनेक लोकांना आवडतात. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर अजून व्हायरल होणार असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.