VIDEO | मांजराचं कुत्र्याचं भांडण, कुत्र्याला जोराचा मारा पंजा, कुत्रा जमिनीवर गोल गोल फिरू लागला, मग…

VIRAL VIDEO | कुत्रा आणि मांजराचं ज्यावेळी भांडण होतं, त्यावेळी नेमकं काय झालंय हे तुम्हाला व्हिडीओ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल एवढं मात्र नक्की.

VIDEO | मांजराचं कुत्र्याचं भांडण, कुत्र्याला जोराचा मारा पंजा, कुत्रा जमिनीवर गोल गोल फिरू लागला, मग...
Cat Dog Fight Trending Video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 08, 2023 | 10:42 AM

मुंबई : आपणं असं ऐकलं आहे की, कुत्रा आणि मांजर हे एकमेकांचे कट्टर (Cat Dog Fight) विरोधक आहेत. विशेष म्हणजे दोन्ही प्राणी एका घरात पाहायला मिळतात, हे सुध्दा विशेष आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Trending Video) झाला आहे. त्यामध्ये दोन प्राण्यांमध्ये एकमेकांबाबत किती प्रेम आहे हे पाहायला मिळत आहे. ज्यावेळी मांजराचं आणि कुत्र्याचं भांडणं होतं. त्यावेळी मांजराने पाय मारल्यानंतर कुत्र्याची (Cat Dog Fight Trending Video) अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. कुत्र्याने जे काय काही केलं आहे, ते पाहून तुम्ही सुध्दा पोट धरून हसाल एवढं मात्र नक्की.

दोन्ही प्राणी एकमेकांशी भांडण करतात

ट्विटरवरती एक व्हिडीओ शेअर (Pet Animals Video) झाला आहे, त्यामध्ये एक कुत्रा आणि मांजर दिसत आहे. काही वेळाने दोन्ही प्राणी एकमेकांशी भांडण करतात. भांडण सुरु असताना मांजर कुत्र्याला पंजा मारते. त्यावेळी मांजराच्या समोर कुत्रा गोल गोल फिरु लागतो. मांजर त्या कुत्र्याकडे एक सारखं पाहत बसतं. हा मजेदार व्हिडीओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला

कुत्रा आणि मांजरांचा हा व्हिडीओ लाखो लोकांना पाहिला आहे. हा व्हिडीओ कॉमेडी असल्यामुळे अनेकांनी हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती @buitengebieden नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ @buitengebieden नावाच्या अकाऊंटवरती 2.2 मिलियन फॉलोअर्ससाठी शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 16 लाख लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. त्याचबरोबर ६० हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे.