VIDEO | लग्नाच्या मंडपात विधी सुरु, अचानक एका माकडाने वधू-वराच्या डोक्यावर घेतली झेप, मग…

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी एका लग्नाच्या मंडपात बसले आहेत. त्याचवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या विधी सुरु आहेत. वधू आणि वर यांच्यामध्ये एक मोठी टोपली ठेवलेली व्हिडीओमध्ये दिसत आहे

VIDEO | लग्नाच्या मंडपात विधी सुरु, अचानक एका माकडाने वधू-वराच्या डोक्यावर घेतली झेप, मग...
monkey jump
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 25, 2023 | 3:11 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतात. काही व्हिडीओ असे असतात, की त्यामुळे लोक हैराण होतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते पाहिल्यानंतर अनेकदा हसू देखील आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण त्या व्हिडीओत जे काही घडलं आहे, ते तुम्ही यापुर्वी कधीही पाहिलेलं नाही. ज्यावेळी लग्नातील विधी सुरु असतातत. त्यावेळी नवरा आणि नवरीच्या अंगावर माकडाने (Monkey jumps) उडी घेतली. त्यानंतर काय झालं ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहा.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी एका लग्नाच्या मंडपात बसले आहेत. त्याचवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या विधी सुरु आहेत. वधू आणि वर यांच्यामध्ये एक मोठी टोपली ठेवलेली व्हिडीओमध्ये दिसत आहे, त्या टोपलीत पिवळे तांदूळ ठेवलेले आहेत. वधू आणि वर दोघेही त्यांच्या हातात पिवळे तांदूळ भरून आणि एकमेकांच्या डोक्यावर ठेवत आहेत. हे सगळं सुरु असताना अचानक एका माकडाने डोक्यावर नवऱ्याच्या उडी मारली. त्यानंतर माकडानेही वधूच्या डोक्यावर उडी मारली आणि तेथून पळ काढला. हे सगळं तिथं असणाऱ्या एका व्यक्तीने सगळं मोबाईलमध्ये शूट केलं आहे.

माकडाला पाहून नवरा आणि नवरी अधिक घाबरली आहे. तिथं त्यावेळी अचानक गंभीरस्थिती निर्माण झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ telugu.beats_1_4_3 नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आले. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्सही करीत आहेत. त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट सुध्दा आल्या आहेत. त्याचबरोबर तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल सुध्दा झाला आहे.