Video: मुलाने मगरींनी भरलेल्या तलावात मारली उडी, पुढच्या क्षणी काय घडले ते पाहा व्हिडीओत

Video: तलावात असंख्य मगरी, मुलाने मारली उडी, व्हिडीओ पाहताना अनेकांच्या अंगावर काटा आला

Video: मुलाने मगरींनी भरलेल्या तलावात मारली उडी, पुढच्या क्षणी काय घडले ते पाहा व्हिडीओत
Crocodile Alligators Viral Video
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 28, 2022 | 11:22 AM

मुंबई : अनेकदा मगरीच्या (Crocodile) भीतीमुळे अनेकजण पाण्यात उतरण्यास घाबरत असतात. नदी, धरण आणि तलाव या ठिकाणी आतापर्यंत मगरींनी अनेकांवरती जोरदार हल्ला केला आहे. त्यामुळे अनेकांना पाण्यात जाण्यापूर्वी घाम फुटतो. विशेष म्हणजे मगरींनी केलेल्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ (Viral Video) आपण सोशल मीडियावर आवडीने पाहतो. त्यामुळे मगरीचा अंदाज घेऊन अनेकजण पाण्यात उतरतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका मुलाने मगरींनी भरलेल्या तलावात उडी मारली आहे. सध्या हा व्हिडीओ चार लाखांच्यावरती पाहिला गेला आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे ?

एका तलावात असंख्य मगरी दिसत आहेत. त्या इकडून-तिकडे फिरत आहे. एक मुलगा तलावाच्या शेजारी कपडे काढून उभा आहे. तो मगरीच्या अंगावर अचानक झेप घेतो. त्यानंतर तो पोहत पुढे जात आहे. काही मगरी त्यांच्या अंगावर खेळत आहेत. त्या मुलाला कसल्याही प्रकारचं भय नाही. त्याचबरोबर तो त्या मगरीच्यासोबत खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप समजलेलं नाही. परंतु मुलाचं डेरिंग लोकांना अधिक आवडलं आहे. त्यामुळे मुलांनी लोकांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

@criancafazendoM या ट्विटरच्या युझरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 20 हजारपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे.