Video : चित्ता आणि हरणामध्ये झटापट, हरणाच्या ‘त्या’ झेपेची सोशल मीडियावर चर्चा, व्हीडिओ एकदा बघाच…

| Updated on: Apr 16, 2022 | 10:52 AM

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात हरिण पुढे धावतं. त्याच्या मागे चित्ता... असं ते धावत असतात. चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय.

Video : चित्ता आणि हरणामध्ये झटापट, हरणाच्या त्या झेपेची सोशल मीडियावर चर्चा, व्हीडिओ एकदा बघाच...
एक झेप आणि हरणाची चित्त्याच्या तावडीतून सुटका
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात काही प्राण्यांचेही व्हीडिओ असतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हीडिओ आहे चित्ता (Leopard) आणि हरणाचा (Deer). चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी येतो आणि मग पुढे काय होतं हे या व्हीडिओत पाहायला मिळतं. हरिण पुढे धावतं. त्याच्या मागे चित्ता… असं ते धावत असतात. चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय. हरणाच्या धावण्याचा वेग जास्त असतो. त्याला पकडण्यासाठी चित्त्यांची दमछाक होते. पण चित्तादेखील आपली शिकार काही सोडण्याला तयार नसतो. या सगळ्यात एक क्षण मात्र सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून टाकतो.

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात हरिण पुढे धावतं. त्याच्या मागे चित्ता… असं ते धावत असतात. चित्ता हरणाची शिकार करण्यासाठी आपली सर्व ताकद एक करून हरणाच्या मागे धावताना दिसून येतोय. हरणाच्या धावण्याचा वेग जास्त असतो. त्याला पकडण्यासाठी चित्त्यांची दमछाक होते. पण चित्तादेखील आपली शिकार काही सोडण्याला तयार नसतो. या सगळ्यात एक क्षण मात्र साऱ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडतो. हरिण चित्त्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी पक्ष्याप्रमाणे हवेत झेप घेतो. हरणाची ही उडी पाहून अनेकजण अवाक झाले आहेत. अत्यंत चपळाईने या हरणाने चित्त्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात हरिण यशस्वी होऊ शकलं नाही. चित्त्याने हरणाला गाठलं त्याची शिकार केली. पण या सगळ्यात या चित्त्याच्या शिकारीपेक्षा हरणाच्या त्या झेपेची विशेष चर्चा होतेय.

सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या हरणाच्या झेपेचं विशेष कौतुक केलं जात आहे.

संबंधित बातम्या

Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!

कोव्हीड पोर्टलऐवजी पॉन साईटची लिंक शेअर, आरोग्य मंत्रालयाचा भोंगळ कारभार!

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…