Saudi Arabia : जगातील आठवे आश्चर्य सौदी अरेबियात! 120 किमी लांबची इमारत; एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी हायस्पीड रेल्वेलाईन

| Updated on: Jul 26, 2022 | 5:57 PM

भव्य दिव्य असा हा साईडवे स्कायस्क्रॅपर प्रोजेक्ट आहे. 120 किमी लांबीच्या या इमारतीत तब्बल 50 लाख लोक राहू शकतात. या इमारतीला ‘मिरर लाईन’ असे नाव देण्यात आले आहे. कारण या इमारतीच्या बांधकामात आरसे वापरले जाणार आहेत. इजिप्त मधील पिरामिड प्रमाणे या इमारतींचे बांधकाम केली जाणार आहे.

Saudi Arabia : जगातील आठवे आश्चर्य सौदी अरेबियात! 120 किमी लांबची इमारत; एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी हायस्पीड रेल्वेलाईन
Follow us on

सौदी : जगातील आठवे आश्चर्य सौदी अरेबियात पहायलाCrown Prince Mohammed bin Salman of Arabia मिळणार आहे. जगातील सर्वात लांब स्कायस्क्रॅपर(skyscraper) अर्थात इमारत सौदी अरेबियामध्ये(Saudi Arabia) होणार आहे. 120 किमी लांबची ही इमारत (120 km long building) ही इमारत एम्पायर स्टेट(Empire State Building) बिल्डिंगपेक्षा लांब असणार आहे. ही इमारत म्हणजे सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान() यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात आहे. जानेवारी 2021 मध्ये युवराजांनी या अनोख्या ड्रीम प्रोजेक्टचा खुलासा केला होता. इजिप्तच्या पिरॅमिडच्या धर्तीवर सौदी अरेबियातील पिरॅमिड्सच्या निर्मिती करण्याचाही त्यांचा प्लान आहे. हा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारण्यासाठी 766 अब्ज इतका खर्च येणार असून याच्या निर्मितीचे काम तब्बल 50 वर्ष चालणार आहे.

या इमारतीत 50 लाख लोक राहू शकतात

भव्य दिव्य असा हा साईडवे स्कायस्क्रॅपर प्रोजेक्ट आहे. 120 किमी लांबीच्या या इमारतीत तब्बल 50 लाख लोक राहू शकतात. या इमारतीला ‘मिरर लाईन’ असे नाव देण्यात आले आहे. कारण या इमारतीच्या बांधकामात आरसे वापरले जाणार आहेत. इजिप्त मधील पिरामिड प्रमाणे या इमारतींचे बांधकाम केली जाणार आहे.

वाळवंटी शहर ‘निओम’मध्ये उभी राहणात इमारत

ही इमारत वाळवंटी शहर ‘निओम’ चा एक भाग आहे. यात 1600 फुट उंचीच्या दोन इमारती असणार आहेत. या इमारती वाळवंटात एक दुसरीला समांतर बांधल्या जाणार आहेत. हे काम पूर्ण होण्यास 50 वर्षे लागतील असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण पृथ्वीची वक्रता लक्षात घेऊन हे बांधकाम करावे लागणार आहे.

इमारतीत हायस्पीड रेल्वेलाईन सुविधा

या इमारतीची स्वतःची हायस्पीड रेल्वेलाईन असणार आहे. 20 मिनिटात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला पोहोचता येणार आहे. रीन्यूएबल विजेवर या इमारतीचे सर्व काम चालेल.

इमारतीत हिरवळ, घरे आणि शेते

या इमारतीच्या परिसरात मैलोन्मैल हिरवळ, घरे आणि शेते असतील. येथे राहणाऱ्यांना तीन वेळच्या जेवणासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे असेही सांगितले जाते. ही इमारत कार्बन न्युट्रल असेल आणि जमिनीपासून 1 हजार फुट उंचीवर स्टेडीयम बांधले जाणार आहे.
याचा आकार जवळपास मॅसाच्युसेट्सइतका असेल आणि ही इमारत एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा लांब असणार आहे.