Video | शेतकऱ्याने जुगाड करुन काही मिनिटांत गव्हाची कापणी केली, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कौतुक केलं

Viral Video | सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक शेतकरी गहू या पीकाची काढणी जुगाड करुन काढत आहे. त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे.

Video | शेतकऱ्याने जुगाड करुन काही मिनिटांत गव्हाची कापणी केली, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कौतुक केलं
Farmer (3)
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 09, 2023 | 9:09 AM

मुंबई : वातावरणात (Climate Change) मोठा बदल झाला आहे, अशी शेतकऱ्यांमध्ये (Farmer) चर्चा आहे. कारण अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पुर्वी क्वचित पडायचा. आता अवकाळी पाऊस एकदा सुरु झाला तर आठ दिवस सतत पडतो. सध्या रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आला आहे. उन्हाचा तडाखा बसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळेना झालेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांने गहू काढण्यासाठी एक जुगाड केलाय, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी त्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे. खरंतर गहू काढण्याच्या मशीन अधिक महाग आहे. त्याचबरोबर अनेक यंत्र शेतकऱ्यांना घेणं परवडत नाही.

काही शेतकरी आपल्या डोक्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतात हे वारंवार दिसून आले आहे. मजूर मिळत नसताना शेतकऱ्याने केलेली आयडीया सगळ्यांना आवडली आहे. त्याचबरोबर ही मशीन पाहायला सुद्धा अधिक शेतकरी जात आहेत. शेतकऱ्याचा जुगाड सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @TansuYegen नावाच्या ट्विटर खात्यावरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसत असलेला शेतकरी पारंपारिक शेती करतो. चांगला आलेला गहू काढण्यासाठी जुगाड करुन एक यंत्र तयार केलं आहे. त्या यंत्राच्याद्वारे गहू कापत असल्याचे पाहून अनेकांना आनंद झाला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याने तयार केलेले यंत्र काही मजूरांचं काम सहज करु शकते.

आतापर्यंत १ मिलियन लोकांनी व्हिडीओ पाहिला…

सध्या शेतकऱ्याने जुगाड केलेलं यंत्र अधिक व्हायरल झालं आहे. त्याचबरोबर हे यंत्र प्रत्येक शेतकरी वापरु शकतो. खूप सोप्या पद्धतीने ते मशीन गहू या पीकाची कापणी करीत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ 1 मिलियन लोकांनी पहिला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला आहे. त्याचबरोबर त्यांनी शेअर सुध्दा केला आहे. त्या व्हिडीओला चांगल्या कमेंट सुध्दा आल्या आहेत.