Video Viral : अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला ‘कोब्रा’शी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर…

साप (Snake) हा किती भितीदायक प्राणी आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचा आकार किंवा प्रकार कोणताही असो, त्यांच्याशी भिडणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखं आहे. एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक कोंबडी (Hen) आपल्या पिलांना वाचवण्यासाठी कोब्रा (Cobra Snake) या अतिभयंकर आणि सर्वात जास्त विषारी असलेल्या सापाशी जोरदार भिडत आहे.

Video Viral : अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला कोब्राशी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर...
कोंबडी-साप
| Updated on: Jan 28, 2022 | 1:20 PM

Snake Video : साप (Snake) हा किती भितीदायक प्राणी आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचा आकार किंवा प्रकार कोणताही असो, त्यांच्याशी भिडणं म्हणजे जीवावर बेतण्यासारखं आहे. असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक कोंबडी (Hen) आपल्या पिलांना वाचवण्यासाठी कोब्रा (Cobra Snake) या अतिभयंकर आणि सर्वात जास्त विषारी असलेल्या सापाशी जोरदार भिडत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की कोंबडी आपल्या अंड्यांवर बसली आहे, जेव्हा एक काळा साप त्यांच्या घरट्याजवळ येतो. फणा काढून प्राणघातक कोब्रा साप कोंबड्याजवळ येऊन बसतो आणि कोंबड्यावर हल्ला करतो, त्यानंतर कोंबडीही आपल्या चोचीनं हल्ला करू लागते. कोब्रा साप आपली अंडी गिळू नये, असा कोंबडीचा प्रयत्न आहे. यामुळे कोंबडीदेखील आक्रमणकर्ता बनते.

कोब्राला मारते चोच

कोंबडी त्याच्यावर अनेकदा चालून जाते, हल्ला करते. आपल्या तीक्ष्ण चोचीनं आणि सततच्या हल्ल्यानं कोंबडी सापाला तिथून दूर राहण्याचा इशारा करते. सापही कोंबड्यासमोर टक लावून, फणा काढून असतो. कोंबडी हार मानत नाही आणि कोब्रा तिथून जाईपर्यंत चोच मारत राहते.

इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर

हा व्हिडिओ hayatvahsh2019 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक कोंबडीला शाबासकी देत आहेत आणि कोंबडीच्या पिलांचं रक्षण व्हावं, असं म्हणत आहेत. साप दूर जाईपर्यंत कोंबडी त्या सापासमोर लढत राहिली याचं आश्चर्य वाटणारे काही लोक आहेत. एका यूझरनं म्हटलं, की आम्ही कल्पनाही केली नव्हती, साप आणि कोंबडीमध्ये भांडण होऊ शकतं.’ शेकडो लोक हा व्हिडिओ पाहत आहेत आणि शेअर करत आहेत.

 

Photos : अंतराळात सापडली रहस्यमय वस्तू; वैज्ञानिक म्हणतायत हे भयावह, आधी कधीही पाहिलं नाही!

डोंगराळ रस्त्यावर अडकला ट्रक, पुढे काय होतं? Video सोशल मीडियावर Viral

Video : चक्क स्पायडर मॅन खेळतोय Squid Game, तोच जीवघेणा खेळ आणि पाठलाग करणारा बंदुकधारी!