Video : चक्क स्पायडर मॅन खेळतोय Squid Game, तोच जीवघेणा खेळ आणि पाठलाग करणारा बंदुकधारी!

Video : चक्क स्पायडर मॅन खेळतोय Squid Game, तोच जीवघेणा खेळ आणि पाठलाग करणारा बंदुकधारी!
जर्मन स्पायडी

कोरियन वेवसिरीज स्क्विड गेम (Squid Game) तुम्ही पाहिली असेलच. आता स्क्विड गेमवर असाच एक भन्नाट व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर आपल्याला पाहायला मिळतोय.

प्रदीप गरड

|

Jan 27, 2022 | 12:33 PM

Spider Man Squid Game : कोरियन वेवसिरीज स्क्विड गेम (Squid Game) तुम्ही पाहिली असेलच. जगभरात आतापर्यंत सर्वात जास्त पाहिली गेलेली आणि प्रचंड लोकप्रिय अशी ही वेबसिरीज (Web series) असून याचा विषयदेखील तितकाच हटके होता. आता या वेबसिरीजवर व्हिडिओ क्रिएटर्स आपापल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवणार नाहीत, असं कसं होणार? एखादं गाणं आलं की मग त्यावर डान्सचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. आता स्क्विड गेमवर असाच एक भन्नाट व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर आपल्याला पाहायला मिळतोय.

यूट्यूब चॅनेलवर शेअर

जर्मन स्पायडी (German Spidey) या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्विड गेम या वेबसिरीजची थीम घेण्यात आलीय. स्क्विड गेममध्ये जीवघेणे खेळ दाखवण्यात आलेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एकूण 456 लोकांसह खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेची कथा यात दाखवण्यात आलीय. हे सर्व लोक कर्जातून बाहेर पडण्यासाठी एका खेळाचा भाग बनतात, ज्यामध्ये त्यांना लहान मुलांचे काही खेळ खेळावे लागतात. जे पराभूत होतात, ते आपला जीव गमावतात, अशी ही कथा आहे.

करतोय पाठलाग

लहान मुलांचे खेळ मोठे खेळतात, पण ते जीव घेणारे असतात. हा एक वेगळाच विषय असून त्यावरच जर्मन स्पायडी या चॅनेलवर छोटासा व्हिडिओ पाहायला मिळतोय. एक स्पर्धक आणि त्याच्यामागे एक बंदूकधारी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेल. स्टेप बाय स्टेप स्पर्धक खेळतोय आणि त्याच्यामागे बंदूक घेतलेली एक व्यक्ती पाठलाग करतेय. हा व्हिडिओ लोकांना आवडला असून 1,925,067+ व्ह्यूज याला मिळाले आहेत. The floor is Lava असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलंय.

तीच भयावह म्यूझिक 

या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला तीच भयावह म्यूझिक तुम्हाला ऐकायला मिळेल, जी स्क्विड गेम पाहताना आपल्याला ऐकायला मिळाली होती. या व्हिडिओला अनेकांनी लाइक केलं असून कमेंट्सही भरभरून होत आहेत. जर्मन स्पायडी (German Spidey) या चॅनेलवर साधारणपणे स्पायडरमॅन स्टंट करतानाचे व्हिडिओ अपलोड होत असतात. थीम वेगवेगळ्या असतात. यात स्क्विड गेमचीही एक थीम बनवण्यात आलीय. (Video Courtesy – German Spidey)

 

‘ही शर्यत रे अपुली…’ अशी शर्यत तुम्ही कधीच पाहिली नसेल, कुत्र्यांचा मनोरंजक Video पाहाच

डोंगराळ रस्त्यावर अडकला ट्रक, पुढे काय होतं? Video सोशल मीडियावर Viral

टेस्टी आणि चटकन् होणारी डिश ट्राय करायचीय? हा Video पाहा; तुम्हीही म्हणाल, Wow delicious!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें