AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | अस्वलापासून जीव वाचवण्यासाठी माणूस झाडावर चढू लागला, अस्वलही चढले आणि माणसाचे पाय ओढू लागले, मग…

ज्यावेळी एका व्यक्तीला झाडावर चढताना अस्वल पाहत आहे. त्यावेळी ते अस्वल त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागते आणि त्याचा पाठलाग करताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

VIDEO | अस्वलापासून जीव वाचवण्यासाठी माणूस झाडावर चढू लागला, अस्वलही चढले आणि माणसाचे पाय ओढू लागले, मग...
bear viral videoImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 13, 2023 | 10:57 AM
Share

मुंबई  : तुम्हाला जंगलात (Forest Area) पायी फिरायला आवडतं का ? समजा तुम्हाला जंगलात पायी फिरायला आवडतं असेल, तर हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहा. व्हिडीओमध्ये (Viral Video) एक व्यक्ती जंगलात पायी चालत असल्याचे दिसत आहे. ज्यावेळी तिथं असलेल्या अस्वल आणि त्या व्यक्तीची समोरसमोर भेट होते. त्यावेळी ती घाबरलेली व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी काय करीत आहे हे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे, त्याचबरोबर त्यावर अनेकांनी कमेंट (bear viral video) सुध्दा केल्या आहेत.

त्या व्हिडीओमध्ये एक अस्वल झाडावर आपला जीव वाचवण्यासाठी चढलेल्या व्यक्तीचा पाठलाग करीत आहे. ज्यावेळी जंगलात अस्वल त्या व्यक्तीला पाहते, त्यावेळी ते पाठलाग करु लागते. त्यावेळी ती व्यक्ती झाडावर चढत आहे, अस्वल जाऊन त्या व्यक्तीचा पाय पकडते. त्यादरम्यान ती व्यक्ती अत्यंत धाडसाने झाडावर चढते, परंतु एका स्टेजला गेल्यानंतर अस्वल झाडावर चढण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ एखाद्या व्यक्तीने तयार केला आहे असं वाटतंय, परंतु हा खरा व्हिडीओ आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ऑडली टेरिफायिंग ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 1 मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. लोकांनी या व्हिडीओला पाहून हजारो कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले, अस्वलालाही झाडावर चढणे माहित असते. दुसऱ्याने लिहिले – तो पाण्यात धावू शकतो आणि पोहू शकतो.

सोशल मीडियावर प्राण्यांचे असे व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ लोकांच्या पसंतीला पडतात. त्याचबरोबर असे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा लोकं कमेंट करतात आणि शेअर करतात.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.