
मुंबई : एक व्हायरल बातमी (Viral News) आहे, त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुध्दा आहे. एका रेड्याच्या उत्पन्नाच्या जीवावर मालक करोडपती बनला आहे. मालक दर महिन्याला त्या रेड्याचे (Buffalo) वीर्य विकून त्यातून पंचवीस लाख रुपये कमावत असल्याची माहिती एका वेबसाईटने (Websites) दिली आहे. या रेड्याचे वीर्य अनेक कारणांसाठी वापरले जाते. त्यामध्ये विशेष म्हणजे नव्या म्हैशीच्या प्रजाती शक्तशाली व्हाव्यात यासाठी प्रामुख्याने वापर केला जातो.
मोंगकोल मोंगफेट मोटी असं त्या रेड्याच्या मालकाचं नाव आहे. त्यांनी त्या रेड्याचं नाव ‘बिग बिलियन’असं ठेवलं आहे. मालक या रेड्याला अनेक स्पर्धेसाठी घेऊन जातात. ‘बिग बिलियन’या रेड्याने आतापर्यंत मालकाला अनेक पारितोषिक जिंकून दिले आहेत. मोंगकोल मोंगफेट मोटी यांच्याकडे त्या जातीचे वीस रेडे आहेत.
कलासिन शहरतील निवासी असलेल्या मोगकोल हे सांगतात, की त्या जातीच्या रेड्यांना खरेदी करण्यासाठी लोकांची लाईन लागते. विशेष म्हणजे एका शेतकऱ्याने रेडा खरेदी करण्यासाठी साडे सात करोड रुपयांची किंमत लावली होती. मोगकोल यांनी हा रेडा बारा लाख रुपयात खरेदी केली आहे. ही घटना थायलंड या देशातील आहे. त्यामुळे थायलंड देशात त्या रेड्याची अधिक चर्चा आहे.
भारतातही अशीच एक रेडा आहे. त्या रेड्याचे नाव भीम आहे, ती मुर्राह प्रजातीचा रेडा आहे. जोधपुरमध्ये जवावरांच्या यात्रेत या म्हैशीची किंमत एक परदेशी नागरिकाने 24 करोड लावली होती. पण मालकाने ती म्हैस विकायला नकार दिला होता.