तो शिक्षक आणि विद्यार्थ्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ! त्यामागचं सत्य माहिते का? शिक्षिकेची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 15, 2022 | 4:40 PM

"पुन्हा असा खोडकरपणा करणार नाही" असं आश्वासन देत आपल्या शाळेतील शिक्षकाची माफी मागतो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांना आपल्या शाळेचे दिवस आठवतात.

तो शिक्षक आणि विद्यार्थ्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ! त्यामागचं सत्य माहिते का? शिक्षिकेची प्रतिक्रिया
Teacher Student Viral Video
Image Credit source: Social Media
Follow us on

नुकताच एका क्लासरुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Classroom Viral Video) व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक लहान मूल “पुन्हा असा खोडकरपणा करणार नाही” असं आश्वासन देत आपल्या शाळेतील शिक्षकाची माफी मागतो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांना आपल्या शाळेचे दिवस आठवतात. आमच्या काळातही असेच शिक्षक असायला पाहिजे होते अशी इच्छा लोकं या व्हिडीओ खाली व्यक्त करताना दिसले. आम्हाला राग यायचा आणि कडक शिक्षक मिळायचे असंही काहींचं म्हणणं होतं. व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मूल निरागसपणे आपल्या शाळेतील शिक्षिकेची माफी मागून आपल्या संतप्त शिक्षिकेची (Angry Teacher) समजूत घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता या व्हिडिओतल्या शिक्षिकेचा व्हिडीओ समोर आलाय.

हा व्हिडिओ बिहारमधील छपरा येथील नसून नैनी, प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे असलेल्या जयपुरिया इन्स्टिट्यूटमधील असून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी आहेत.

3 सप्टेंबर रोजी विशाखा यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. विशाखा त्रिपाठी प्रयागराजमधील सेठ आनंदराम जयपुरिया स्कूलमध्ये शिकवतात.

व्हायरल व्हिडीओच्या शिक्षिका विशाखा त्रिपाठी यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला.

त्या म्हणतात की मुले बऱ्याच वेळा चुका करतात. पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावलं, तर ते मान्य करतात. अनेक वेळा शिक्षक या मुलांवर रागावतात, त्यांना मारतात सुद्धा, पण आपण ते टाळायला हवे. मुलांना प्रेम द्यायला हवं.

पाहा व्हिडिओ-

व्हायरल झालेला व्हिडीओ

व्हिडिओमध्ये एका वर्गात शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याला सांगताना दिसत आहेत – ‘मी तुझ्याशी बोलणार नाही, तू असं पुन्हा पुन्हा कर.’ त्यावर मुलगा माफी मागतो आणि म्हणतो- ‘मी आतापासून असं करणार नाही.’

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडला होता हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. हा व्हिडिओ सर्वात आधी शेअर करणाऱ्यांमध्ये ‘छपरा डिस्ट्रिक्ट’ नावाचं ट्विटर हॅण्डल होतं, त्यानंतर अनेकांनी हा बिहारमधील छपरा येथील एका शाळेचा व्हिडिओ असल्याचं गृहीत धरलं होतं. पण ते खरं नाही.