
मुंबई : मागच्या कित्येक वर्षांपासून लोक भविष्यात हवेत चालणारी बाईक (Flying Bike) कशी असेल याची कल्पना करीत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्याबाबत स्वप्न सुध्दा रंगवली आहेत. काही लोकांनी स्वत:च्या कारला एखाद्या बाईकप्रमाणे तयार केलं आहे. हवेत उडणारी कारचं सु्द्धा अनेक स्वप्न पाहत आहेत. फ्लाइंग कार (Flying Car)हे आजही अनेकांचे स्वप्न असले तरी उडणारी बाईक नक्कीच नाही. सोशल मीडियावर असे रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. त्यापैकी हा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जपानच्या स्टार्ट-अप AERWINS ने XTURISMO नावाच्या फ्लाइंग बाईक तयार केल्याच्या ठळक बातम्या दिल्या आहेत. हवेत उडू शकणारी ही हॉवरबाईक असून संपूर्ण जगातील पहिली उडणारी बाईक म्हणून ओळखली जाईल अशा पद्धतीच्या बातम्या देण्यात आल्या आहेत. हॉवरबाईक सध्या जपानमध्ये विक्रीसाठी आहे. AERWINS चे CEO ही बाईक युनायटेड स्टेट्समध्ये विकण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहे.
XTURISMO एका व्हिडीओने सोशल मीडियावर तुफान राडा घातला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती त्या बाईकमध्ये बसल्याचं दिसत आहे. तर दुसरा कित्येक अंतरावरुन हे सगळं दृष्य पाहत आहे. बाईक चालवण्यासाठी जो पुरुष बसला आहे. त्या बटन दाबल्यानंतर काही सेकंदात ती बाईक हवेत उडायला सुरुवात करते. हा व्हिडीओ @entrepreneursquote इन्स्टाग्रामरती शेअर केला आहे. खरंतर हा व्हिडीओ @xturismo_official यांच्याकडून अपलोड करण्यात आला होता.
सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. सध्या हवेत बाईक फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर नेटकरी सुध्दा त्या व्हिडीओच्या खाली कमेंट करुन अनेक प्रश्न विचारत आहेत.