
तुम्ही कधी ‘बकरी गाडी’ कधी पाहिली किंवा ऐकली आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक वृद्ध व्यक्ती दोन बकऱ्यांच्या मदतीने धावणाऱ्या जुगाडू कारवर स्वार होताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
हे फक्त भारतातच होऊ शकतं, असंही अनेकांनी म्हटलंय. तर काही लोकांनी याला बकऱ्यांवरील क्रूरता असे संबोधले. आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ @lsawarmal 17 डिसेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्याला आतापर्यंत 37 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 1 लाख 38 हजार लाइक्स मिळाले आहेत.
हा व्हिडिओ काही सेकंदाचा आहे. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती गुलाबी पगडी आणि तपकिरी रंगाचा कुर्ता परिधान करताना दिसत आहे. तो दोन काळ्या शेळ्यांवर दोन चाकी जुगाडू गाडी चालवताना दिसत आहे.
वाटेने जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्याने हा व्हिडिओ बनवला आहे आणि मग तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा देशी जुगाड पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओवर युजर्सने भरपूर कमेंट केल्या आहेत.