हे दादा बँकेत पैसे जमा करायला गेले आणि स्लिपवर असं काही लिहून आले…खूप हसाल!

| Updated on: Nov 15, 2022 | 6:30 PM

कर्मचारी पण सगळंच पडताळत बसत नाहीत, एखादी गोष्ट सुटून जाते. असाच एक किस्सा व्हायरल होतोय.

हे दादा बँकेत पैसे जमा करायला गेले आणि स्लिपवर असं काही लिहून आले...खूप हसाल!
man went to bank and then...
Image Credit source: Social Media
Follow us on

जेव्हा जेव्हा तुम्ही बँकेत पैसे जमा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला डिपॉझिट फॉर्मवर तपशील भरावा लागतो. स्लिपवर खातेदाराची नावेच लिहावी लागतात असे नाही, तर खाते क्रमांक, शाखा, तारीख, मोबाइल क्रमांक, रक्कम हे सगळंच लिहावं लागतं. मात्र ही स्लिप भरताना काही जण गोंधळून जाऊन काहीतरीच लिहून टाकतात. चूक झाली तर बँक कर्मचारी त्याला पुन्हा दुरुस्त करायला सांगतात. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आपलं काम लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न करतात. कर्मचारी पण सगळंच पडताळत बसत नाहीत, एखादी गोष्ट सुटून जाते. असाच एक किस्सा व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर एक बँक स्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेला होता, परंतु असे काहीतरी होते ज्यावर आपण हसणे थांबवू शकणार नाही.

होय, डिपॉझिट स्लिप भरताना त्या व्यक्तीने सर्वकाही बरोबर लिहिले, पण जेव्हा त्याला स्लिपवर रक्कम भरण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्याने तूळ लिहिले.

हे लिहून झाल्यावर खातेदार स्लिप व एक हजार रुपये जमा करण्यासाठी गेला असता बँक कर्मचाऱ्याने त्याकडे लक्ष दिले नाही. त्या व्यक्तीने दिलेले पैसे जमा करून शिक्का मारून रिटर्न स्लिप दिली.

या छोट्याशा चुकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक त्याची खूप खिल्ली उडवत आहेत. ट्विटरवर हा फोटो @NationFirst78 नावाच्या एका अकाऊंटने शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘किती जबरदस्त लोक आहेत इथे.’

स्लिपच्या वरच्या भागावर तुम्ही पाहू शकता की, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील आहे. मात्र, ते कोणी मस्करीत लिहिले आहे की खरंच चूक आहे, याची माहिती मिळू शकली नाही. सध्या स्लिपवरचा शिक्का पाहता ही चूक होऊनही खातेदाराचे पैसे बँकेत जमा झाल्याचे कळते.