
सोशल मीडियामुळे केवळ माहितीची देवाण-घेवाणच झाली नाही, तर लोकांना कमावण्याची संधीही मिळाली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनून लोक आता लाखोंच्या घरात कमाई करतात. त्यांना सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट द्यावा लागतो. कुणी डान्स व्हिडिओ बनवतो, कुणी अभिनयात कौशल्य दाखवतो. काही ट्रॅव्हल ब्लॉगरही बनतात. पण झोपताना एखादी व्यक्ती लाखो रुपये कमवत आहे, असं जर तुम्हाला कुणी सांगितलं, तर तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण ते खरं आहे. आपण ज्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दल बोलत आहोत, तो ‘स्लीपिंग’ व्हिडिओ बनवून वर्षाकाठी तीन कोटींची कमाई करतो.
जॅकी बोहम ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये राहतात. व्यवसायाने वेब डेव्हलपर असलेल्या जॅकी बोहमचे टिकटॉकवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तो रोज रात्री 10 वाजता झोपी जातो. या काळात तो ऑनलाइन असतो आणि त्याचे फॉलोअर्स त्याला ऑनलाइन बघत असतात.
आता जर एखाद्या चाहत्याला झोपताना त्यांना उठवायचं असेल तर त्यासाठी त्याला काही तरी पैसे मोजावे लागतात. अशाच पद्धतीने जॅकी झोपतानाही कमावतो.
द ऑस्ट्रेलियनच्या रिपोर्टनुसार, जॅकीचे प्रेक्षक त्याच्यासाठी ऑनलाइन सेशन दरम्यान व्हर्च्युअल गिफ्ट्स खरेदी करतात. यामुळे जॅकीच्या खोलीत कसलातरी आवाज येतो आणि त्याचा खोलीत प्रकाश चालू होतो. हा एक प्रकारचा व्हिडीओ गेम आहे जो लोकांना प्रचंड आवडतो.
या सिस्टीमच्या अंतर्गत लोक जॅकीला हवं तेव्हा उठवू शकतात. या माध्यमातून जॅकी महिन्याला सुमारे २८ लाख रुपये कमावतो.
जॅकीच्या या सिस्टिममध्ये 5 मिनिटं लाईट लावली जाते आणि या पाच मिनिटांसाठी त्याच्या फॅन्सना 30 हजार रुपये खर्च करावे लागतात. 30 हजार रुपये देताच ते जॅकीच्या खोलीतील निऑन कलर लाइट 5 मिनिटांसाठी चालू करू शकतात.
जॅकी म्हणतो की तो हे पैसे साठवून ठेवत आहे. त्याला एक छान-मोठं घर घ्यायचं आहे. यासोबतच मानसिक आरोग्याशी संबंधित संस्थांनाही ते मदत करतो. हळूहळू त्याच्या फॉलोअर्सची संख्याही वाढत आहे.