आरे हम गरीब हु ए तो क्या हुआ? लाल किल्ल्यासमोर स्टंट, लई भारी प्रपोज केलं! नकार मिळाला तो भाग वेगळा…

मुलगा त्या परदेशी मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्याने लाल किल्ल्यासमोर मुलीला इम्प्रेस करण्यासाठी हा स्टंट मारलाय.

आरे हम गरीब हु ए तो क्या हुआ? लाल किल्ल्यासमोर स्टंट, लई भारी प्रपोज केलं! नकार मिळाला तो भाग वेगळा...
Boy propose a girl
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 21, 2022 | 12:47 PM

इन्स्टाग्रामवर रिल्सच्या माध्यमातून व्हायरल होण्यासाठी आजकाल अनेक इन्फ्लुएन्सर काहीही करायला तयार असतात. कुणी मुलीला प्रपोज करतं तर कुणाला रस्त्याच्या मधोमध नाचून प्रसिद्ध व्हायचं असतं. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका भारतीय मुलाने सरप्राईज स्टंट करत परदेशी मुलीला प्रपोज केलं. ही क्लिप ऑनलाइन व्हायरल झाली.

या व्हिडिओमध्ये परदेशी लोकांचा एक ग्रुप लाल किल्ल्याजवळ फिरताना दिसतोय. पण त्यानंतर एक भारतीय मुलगा फ्रेममध्ये येतो आणि अचानक बॅक फ्लिप मारून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो.

मुलगा त्या परदेशी मुलीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. त्याने लाल किल्ल्यासमोर मुलीला इम्प्रेस करण्यासाठी हा स्टंट मारलाय.

पण परदेशी मुलगी सुद्दा धीट असते. सहज इम्प्रेस होत नाही. आपल्या ग्रुपसह ती पुढे निघून जाते आणि ती या बॅक फ्लिपने अजिबात इम्प्रेस होत नाही.

तिच्या ग्रुपच्या आजूबाजूच्या मुली आश्चर्यचकित होताना दिसतात. पण ज्या मुलीसाठी हे कष्ट आहेत ती मात्र दुर्लक्ष करते.

मुलीच्या प्रतिक्रियेवरून समजू शकतं की, तिला ते फारसं आवडलं नाही. हातातले गुलाब न स्वीकारता ती पुढे निघून जाते.

या व्हायरल क्लिपने सोशल मीडियावर ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळवलेत. अनेक इन्स्टाग्राम यूजर्स मुलाच्या प्रयत्नांबद्दल सहानुभूती दर्शवताना दिसलेत.