एखादं रस्त्यात पडून जाईल पण लक्षात यायचं नाही इतकी मुलं या सायकलवर! निघाले शाळेला मोठ्या थाटात

| Updated on: Nov 16, 2022 | 4:17 PM

या व्हिडीओमध्ये एक लहान मूल सायकल कॅरिअरवर, कुणी समोरच्या दांडक्यावर बसलेले दिसत आहे.

एखादं रस्त्यात पडून जाईल पण लक्षात यायचं नाही इतकी मुलं या सायकलवर! निघाले शाळेला मोठ्या थाटात
school chale hum
Image Credit source: Social Media
Follow us on

शाळेत जायचे फार वेगवेगळे किस्से असतात. चालत जावं लागतं, कधी स्कुल बस, कधी काय तर कधी काय. अलीकडे सोशल मीडियावरील मुलांचा एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलं सायकल चालवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सायकलवरून एक-दोन नाही तर नऊ मुलं सायकलवरून जात आहेत, जी अतिशय विचित्र पद्धतीने अॅडजस्ट होऊन शाळेत जाताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सायकल चालवताना दिसत असून, समोर आणि मागे जवळपास नऊ मुलं आहेत. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल सायकल कॅरिअरवर, कुणी समोरच्या दांडक्यावर बसलेले दिसत आहे.

त्याचवेळी सायकलच्या पुढच्या चाकाच्या वरच्या कव्हरवर एक लहान मूल बसलेले दिसते. याशिवाय काही मुलं त्या माणसाच्या खांद्यावर लटकत आहेत.

व्हिडिओत मुलं ज्या पद्धतीने बसलेली आहेत, ते पाहता असं वाटतं की जणू काही ते त्यांचं रोजचं काम आहे. काही मुलं शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर काही मुलं कलर ड्रेसमध्ये दिसतात. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, सायकल चालवणारी व्यक्तीच या मुलांना शाळेत सोडणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ @JaikyYadav16 नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आज जगाची लोकसंख्या 8 अब्ज झाली आहे, अशा मानवांनी हे यश मिळविण्यात खूप योगदान दिले आहे.’