गरम होऊ नये म्हणून याने केलेला जुगाड तर बघा! व्हिडीओ व्हायरल

यामुळेच लोक आता AC चा वापर करत आहेत. पण एसी ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला परवडणारी नाही. सामान्य माणूस अजूनही पंख्या खालीच असतो. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

गरम होऊ नये म्हणून याने केलेला जुगाड तर बघा! व्हिडीओ व्हायरल
Fan in summer
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 02, 2023 | 10:55 AM

मुंबई: दरवर्षी उकाडा वाढत आहे. उन्हाळा आला की लोकांना प्रचंड घाम येतो. या उकाड्यात कुणालाच काहीच सुचत नाही. एकेकाळी पंख्याशिवायही लोक आरामात राहत असत, पण आता उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की, पंखे आणि कूलरही निकामी होऊ लागले आहेत. यामुळेच लोक आता AC चा वापर करत आहेत. पण एसी ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला परवडणारी नाही. सामान्य माणूस अजूनही पंख्या खालीच असतो. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

एक व्यक्ती एका मोठ्या प्लॅस्टिकच्या आत झोपते आणि समोरून पंखा चालवते. अशावेळी पंख्याची हवा थेट त्याच्या अंगावर पडते, ही हवा इतरत्र कुठेही जाऊ शकत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती प्लास्टिकच्या आत आरामात कशी झोपली आहे आणि मोबाईल चालवत आहे. त्याने समोर एक पंखा लावला आहे, ज्याची हवा थेट प्लॅस्टिकच्या आत जात आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी एवढी धडपड करताना आपण क्वचितच पाहिले असेल. जुगाडच्या बाबतीत भारतीयांना कोणीही पराभूत करू शकत नाही आणि हा व्हिडिओ पाहून तुमची खात्री पटणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर technical_personnel नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 23 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी ‘हा मूर्खपणा आहे, धोकादायक ठरू शकतो’ असं म्हणतंय, तर कुणी गमतीने ‘पंखा बंद होताच तुम्हाला थेट देव दिसेल’, असं म्हणतंय. काहीही असो, पण हा जुगाड अप्रतिम आहे.