मुंबईतल्या या जुन्या हवेलीची किंमत 1000 कोटींहून अधिक, परंतू तिचा इतिहासही रहस्यमय

| Updated on: Mar 25, 2023 | 5:47 PM

या घराचा इतिहास मोठा रहस्यमय आहे. मलबार हीलच्या या घराचा आणि आपल्या देशाच्या इतिहासाचा संबंध आहे. या घराचे नाव 'साऊथ कोर्ट' असे असून त्याला 1930 च्या दशकाअखेर बांधले होते.

मुंबईतल्या या जुन्या हवेलीची किंमत 1000 कोटींहून अधिक, परंतू तिचा इतिहासही रहस्यमय
south court
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : मुंबईच्या मलबार हील परिसरात अनेक उच्चभ्रू श्रीमंत व्यक्तींची घरे आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यापासून ते अब्जाधीश गोदरेज कुटुंबिय यांची आलिशान निवासस्थानने येथे वसली आहेत. परंतू याच परिसरात एक घर आहे जे एखाद्या जुन्या पुरान्या हवेली सारखे दिसत असून अनेक दशकांपासून त्यात कोणी रहात नसल्याने ते रिकामे आहे. या घराची खरी किंमत त्याच्या इतिहासात आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीसाठी जबाबदार असलेल्या बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी हे घर बांधले होते.

हेक्टर बोलिथो यांच्या ‘जिना, क्रिएटर ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकात एक किस्सा दिला आहे. सर चार्ल्स ओलिवॅंट यांनी जिना यांना त्यांच्या करियरच्या सुरूवातीला 1500 रूपये प्रति महीना नोकरीची ऑफर दिली होती. तेव्हा आपली एक दिवसाची कमाई 1500 रूपये असावी अशी आपली इच्छा असल्याचे सांगत ही ऑफर जिना यांनी धुडकावली होती. आणि लवकरच त्यांनी हे करून दाखविले.

घराने सुख दिले नाही

जिना यांनी आपल्या आयुष्यात इतके पैसे कमावले की 100 वर्षांपूर्वी हवेली सारखे घर मलबार हील परिसरात घेतले. जिना यांचे जुने घर त्यांचे पारसी मित्र दिनशॉ पेटीट याच्या घराजवळ होते. साल 1918 साली 42 वर्षांचे असलेल्या जिना यांनी पहिली पत्नी वारल्याने मित्र दिनशॉ यांची अत्यंत तरूण मुलगी रती हीच्याशी लग्न केले. या लग्नामुळे दोन्ही कडील नातेवाईक नाराज होते. 1928 रती जिनांचे घर सोडून ताज हॉटेलात राहू लागली, एकावर्षांनंतर तिचे आजाराने निधन झाले. त्यानंतर लंडनला गेलेले जिना मोठे वकील बनले.

दुसऱ्या इनिंगमध्ये ते राजकीय नेते बनले

भारताचा स्वातंत्र्याचा लढा जोर पकडत असताना जिना भारतात आले, त्यांची दुसऱ्या इनिंगमध्ये ते राजकीय नेते बनले, भारतातील मुस्लीमांचे मसीहाच बनले. 1936 मध्ये त्यांनी राजकीय बैठकासाठी जागा अपुरी पडल्याने जुन्या घराला पाडून मोठे घर बांधले. लंडनचे महागडे घर विकल्याने पैशाची कमतरता नव्हतीच.त्यावेळी दोन लाख घराची किंमत होती. महात्मा गांधी यांच्या बैठका या घरात झाल्या होत्या. फाळणी नंतर दोन देश झाल्याने त्यांना पाकिस्तान मिळाला पण साऊथ कोर्टचे हे घर हातून गेले. एक वर्षांनंतर 1948 मध्ये जिना यांचा मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वी या घरात कला व सांस्कृतिक केंद्र तयार करण्याची मागणी भाजपा नेते मंगल प्रभात लोढा यांनी केली होती.