या महिलेने दिली 960 वेळा ड्रायव्हींग टेस्ट, खर्च केले 11 लाख, तेव्हा म्हातारपणी मिळाले लायसन्स

| Updated on: Mar 27, 2023 | 3:25 PM

एखादी गोष्ट करण्यासाठी जिद्दीला पेटणारे कमी नाहीत, परंतू ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठी एका महिलेने केलेले प्रयत्न पाहून आपल्याला नक्कीच तिला सलाम करावासा वाटेल...

या महिलेने दिली 960 वेळा ड्रायव्हींग टेस्ट, खर्च केले 11 लाख, तेव्हा म्हातारपणी मिळाले लायसन्स
DRIVING TEST
Image Credit source: socialmedia
Follow us on

सेऊल : आपल्या देशात ड्रायव्हींग लायसन्स मिळविण्याची प्रक्रीया तुम्हाला वेळखाऊ वाटत असेल, तर तुम्ही या महिलेचा किस्सा ऐकला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या महिलेला तिचे ड्रायव्हींग लायसन्स तयार करण्यासाठी अठरा वर्षांची वाट पहावी लागली. यासाठी तिला 960 ड्रायव्हींग टेस्ट द्यावा लागल्या, त्यामुळे या महिलेला वयाच्या 69 वर्षांत अखेर ड्रायव्हींग लायसन्स एकदाचे मिळाले आहे. हे प्रकरण साऊथ कोरीयाचे आहे.

आपल्याला अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच गाडी शिकण्याचा मोह होतो. काही जण मोठ्यांपासून लपून छपून टु व्हीलर तरी शिकतातच. अशा प्रकारे दक्षिण कोरीयाच्या चा सा सून ही महिलची विलक्षण कहानी समोर आली आहे. चा सा सून दक्षिण कोरीयाची राजधानी सेऊलपासून 130 किमी अंतरावर राहतात. या महिलेचे धैर्य आणि चिकाटी पाहून भल्या भल्यांना घाम येईल. एखाद्या गोष्टीत यश येत नसले तर 8 ते 10 वेळा प्रयत्न केल्यानंतर तिचा नाद आपण सोडून देतो. परंतू या महिलेने दर आठवड्याला पाच वेळा ड्रायव्हींग टेस्ट दिली आहे, लागोपाठ तीन वर्षे ती वाहन परवना मिळावा यासाठी झगडत होती.

2005  मध्ये दिली होती पहिल्यांदा टेस्ट

मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार चा सा सून हीने साल 2005 च्या एप्रिल महीन्यात पहिल्यांदा ड्रायव्हींग टेस्टची लेखी परीक्षा दिली होती. यात फेल झाल्यानंतर तिने 780 वेळा ही परीक्षा देण्याचा विक्रमच केला. जोपर्यंत पास होत नाही तो पर्यंत आठवड्याला सरासरी दोन वेळा तिची ही टेस्ट होतच राहीली. त्यानंतर प्रॅक्टीकल टेस्टची वेळ आली. तिला दहा वेळा प्रक्टीकल परीक्षा द्यावी लागली. म्हणजे एकूण 960 वेळा परीक्षांचा सिलसिला झेलल्यानंतर चा सा सूनच्या हाती लायसन्स पडले, आता त्यांचे वय 69 आहे. आणि त्यांना वाहन चालविण्याचा परवाना मिळाला आहे.

लायसन्ससाठी 11 लाख खर्च, ह्युंडईने कार गिफ्ट 

या महिलेने या संपूर्ण वाहन चालक परवाना मिळविण्याच्या नादात आपली अकरा लाखांची कमाई खर्च केली आहे. या महिलेला आपल्या भाजीपाला विकण्याच्या व्यवसायासाठी हे ड्रायव्हींग लायसेन्स हवे होते. तिची कहानी सोशल मिडीयात व्हायरल झाल्यानंतर तिला कोरीयन कंपनी ह्युडंईने नवीन गाडी गिफ्ट केली आहे. लाखो रूपये तिची किंमत आहे. तिला आता या गाडीच्या जाहीरातीतही दाखविले जाणार आहे. या महिलेला लायसन्स मिळाल्यानंतर सर्वात जास्त आनंद तर तिला ड्रायव्हींगचे मार्गदर्शन करणाऱ्या ड्रायव्हींग इस्ट्रक्टरला झाला आहे.